वीर रेल्वे स्थानकात दोन पोलिसांना मारहाण

सुनील पाटकर
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

महाड : श्रीवर्धनच्या समुद्रकिनारी पोलिस निरिक्षकाला पर्यटकांनी मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच महाड तालुक्यातील वीर रेल्वे स्थानकात सेवा बजावत असलेल्या दोघा पोलिसांना तिघांनी मारहाण केली आहे . आज पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मारहाण करणाऱ्या तिघांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्यांना अटक करण्यात आली आहे. मारहाण करणारे तिघेही महाड तलुक्यातील रहिवासी आहेत. 

पोलिसांचे मनोध्येर्य खच्ची करणाऱ्या घटनांमध्ये वाढ होत आहे.महा़ड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी रवि पंडीत धोत्रे आणि पोलिस शिपाई रेड्डी हे वीर रेल्वे स्थानकात आपली सेवा बजावत होते. बुधवारी रात्री तुतारी एक्सप्रेसमधून प्रवास करणारे तिघे रेल्वेतून वीर स्तानकात पहाटे उतरले व येथे उतरुन पायी चालत जात असताना पोलिसांनी त्यांना हटकले व त्यांच्याकडे ओळखपत्र आणि बॅग तपासण्यास मागितली. त्याला या तिघांनी नकार दर्शवला व याचा राग आल्यांने तिघांनी धोत्रे आणि रेड्डी यांना शिविगाळ करुन मारहाण केली तर रेड्डी यांची मान आवळली व सरकारी कामात अडथळा आणला .

या प्रकरणी पोलीस शिपाई रवि धोत्रे यांनी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असुन त्यानुसार पोलिसांनी अक्षय शिवाजी सकपाळ (नागांव,ता.महाड), महेश अदिनाथ येरुणकर व राजा जयराम घावरे (दोघे रा. चांढवे,ता.महाड) या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Two policemen beat up at Veer railway station