पुण्याच्या या दोन प्राध्यापकांचा विश्‍वेश्‍वरय्या उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने गौरव

ब्रिज पाटील | Thursday, 17 September 2020

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचा (एआयसीटीई) पहिला मोक्षगुंडम विश्‍वेश्‍वरय्या उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराचा बहुमान पुण्यातील जेएसपीएम इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या डॉ. शैलजा पाटील आणि व्हीआयटीचे डॉ. श्रीपाद भातलवांडे यांनी मिळाला आहे. या यादीत महाराष्ट्रातील पाच जणांचा समावेश आहे.

पुणे - अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचा (एआयसीटीई) पहिला मोक्षगुंडम विश्‍वेश्‍वरय्या उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराचा बहुमान पुण्यातील जेएसपीएम इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या डॉ. शैलजा पाटील आणि व्हीआयटीचे डॉ. श्रीपाद भातलवांडे यांनी मिळाला आहे. या यादीत महाराष्ट्रातील पाच जणांचा समावेश आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

"एआयसीटीई'तर्फे मोक्षगुंडम विश्‍वेश्‍वरय्या यांच्या स्मरणार्थ तंत्रशिक्षण महाविद्यालयातील प्राध्यापकांना यंदापासून हा पुरस्कार सुरू केला आहे. या पुरस्कारासाठी देशभरातून 261 प्रस्ताव आले होते, त्यातून 12 जणांची यासाठी निवड झाली आहे. डॉ. प्रशांत पवार (एसव्हीईआरआय कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर), डॉ. मालथी आर (तमिळनाडू), डॉ. मोहमंद यार (नवी दिल्ली), डॉ. शैलजा पवार (जेएसपीएम राजश्री शाहू महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे), डॉ. जनेत जयाराज ( तमिळनाडू), डॉ. मानेश कोकारे (श्री गुरुगोविंदसिंगजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग टेक्‍नॉलॉजी, नांदेड), डॉ. तेजल गांधी (गुजरात), डॉ. श्रीपाद भातलवांडे (विश्‍वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (व्हीआयटी) पुणे), डॉ. फारुक काझी (वीरमाता जिजाबाई टेक्‍नॉलॉजीकल इन्स्टिट्यूट, महाराष्ट्र), डॉ. मनीष शर्मा (छत्तीसगड), डॉ. जयवंदन पटेल (गुजरात), डॉ. नंदकुमार मडा (तमिळनाडू) यांचा यात समावेश आहे. अभियंता दिनानिमित्त झालेल्या ऑनलाइन कार्यक्रमात केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी याची घोषणा केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

'संशोधन, शोधपत्रीका, इनोव्हेशन, पेटंट, एंट्रप्रनरशीप, विद्यार्थी व सहकारी प्राध्यापकांना सहकार्य अशा पैलूंवर या पुरस्कारासाठी मूल्यमापन केले जाते. महाविद्यालयाने या पुरस्कारासाठी माझ्या नावाची शिफारस करून विश्‍वास दाखवला. या पुरस्काराचे श्रेय महाविद्यालयाचे सहकारी, विद्यार्थी आणि परिवाराला जाते. महाविद्यालयात इनोव्हेशन, स्टार्टअपसाठी प्रोत्साहन दिले जाते, आम्हाला अटल रॅकिंगचा बहुमानही मिळाला आहे.''
- डॉ. शैलजा पाटील.

'व्हिआयटीमध्ये नवे ज्ञान आत्मसात करणे, प्रयोग करणे त्यासाठी सुविधा, निधी आणि स्वातंत्र्य दिले जाते, त्यामुळे प्राध्यापकांचा आत्मविश्‍वास द्विगुणित होतो. महाविद्यालयाने माझ्यावर विश्‍वास ठेवून मला अनेकवेळा संधी दिली आहे. माझ्या 20 वर्षाच्या कार्यकाळात विद्यार्थ्यांना तुम्ही कसे शिकले पाहिजे हे मी समजावून सांगू शिकलो याचा मला आनंद आहे.''
- डॉ. श्रीपाद भातलवांडे

Edited By - Prashant Patil