#MeToo चळवळीतंर्गत सिंबायोसिसचे दोन प्राध्यापक निलंबित

410_266.jpg
410_266.jpg

पुणे : सिंबायोसिस सेंटर फॉर मीडिया अँड कम्युनिकेशनमधील (एससीएमसी) आजी-माजी विद्यार्थ्यांनी #MeToo चळवळीतंर्गत काही प्राध्यापकांवर आरोप केले होते. या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत या दोन प्राध्यापकांना निलंबित करण्यात आले आहे. तर एका संचालकांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे, अशी माहिती सिंबायोसिसच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर यांनी दिली. 

लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठविणाऱ्या "#MeTooचळवळीने सोशल मिडियावर जोर धरला आहे. या चळवळीअंतर्गत विमाननगर येथील सिंबायोसिस संस्थेत अत्याचार झाल्याची तक्रार काही विद्यार्थ्यांनी सोशल मिडियाद्वारे केली होती. यानंतर संस्थेने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली. या समितीत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमावलीनुसार तीन प्राध्यापक, दोन शिक्षकेतर कर्मचारी, तीन विद्यार्थी आणि एक तज्ज्ञ याचा समितीत समावेश आहे. या समितीमार्फत प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. चौकशीदरम्यान काही माजी विद्यार्थ्यांशी संपर्क साधण्यात येत आहे.

काही विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष येऊन माहिती सांगण्याची तयारी दाखविली आहे. चौकशीदरम्यान संस्थेतील कामकाज सुरळित चालावे म्हणून सेंटरचे संचालकांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. तर दोन प्राध्यापकांना निलंबित केले आहे. समितीची चौकशी पूर्ण होईपर्यंत हे निलंबन असल्याचे डॉ. येरवडेकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com