बारामती उद्योगजकाच्या हत्येचा कट उधळला; दोन संशयितांना अटक

मिलिंद  संगई
सोमवार, 22 जुलै 2019

बारामती : बारामती येथील वकील अँड. प्रसाद भगवानराव खारतुडे तसेच तालुक्यातील नवनाथ उद्योग समूहाचे प्रमुख संग्राम तानाजीराव सोरटे या दोघांची हत्या करण्याचा कट पोलिसांनी उधळून लावला आहे.

बारामती क्राईम ब्रांचने दोन संशयितांना ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. याप्रकरणी संग्राम सोरटे यांनी बारामती शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन संशयितांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, या प्रकरणी एका अतिवरिष्ठ सरकारी अधिका-याचा सहभाग असून याप्रकरणी त्याच्यापर्यंत हा तपास जाऊन पोहोचणार का अशी चर्चा बारामती शहरात सुरू आहे.  बारामती येथील न्यायालयामध्ये सुरू असलेल्या दाव्यांमध्ये वकील प्रसाद खारतोडे हे संग्राम सोरटे यांचे वकील म्हणून कार्यरत होते.  संग्राम सोरटे यांच्याविरोधात न्यायालयामध्ये दाखल असलेल्या दाव्यांमध्ये प्रसाद खारतोडे हे मदत करतात या कारणांवरून प्रसाद खारतोडे व संग्राम सोरटे या दोघांना पिस्तूल तसेच कोयत्याने मागण्यासंदर्भात कट शिजला होता, अशी माहिती प्रसाद खारतोडे यांना एका व्यक्तीकडून समजल्यानंतर त्यांनी थेट पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांची भेट घेऊन त्यांना या सर्व प्रकरणाची माहिती दिली.

पोलिस अधीक्षकांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयंत मीना यांना बारामती क्राईम ब्रांच मार्फत या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अवघ्या चार दिवसांत पोलिसांनी तपास करून जयचंद संतोष जाधव (वय 19, रा. सोमेश्‍वरनगर,  ता. बारामती) तसेच सचिन कल्याण सोरटे (रा. मगरवाडी,  ता. बारामती) या या दोघांना ताब्यात घेतले आहे.

पोलिस या दोघांकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करीत असून याप्रकरणी आणखी काही जणांचा यात सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. प्रसाद खारतुडे यांना 14 जुलैला शेतात एकटे असतानाच मारण्यासाठी दोघे जण आले होते, मात्र त्यापैकी एकाने त्यांना ओळखल्यानंतर त्यांनी हत्येचा बेत बदलला, अशीही माहिती यात पुढे येत आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश अस्वर हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two suspects arrested for attempt to kill industrialist in Baramati