पुण्यात रेल्वेच्या दोन गाड्या रद्द; चार गाड्या होणार लेट 

Two trains canceled and Four trains are delayed at Pune
Two trains canceled and Four trains are delayed at Pune

पुणे : दौंड- पाटस दरम्यान लोहमार्ग देखभाल दुरुस्तीचे (ब्लॉक) काम शनिवारी (ता. 11 मे) सुमारे साडेतीन तास होणार असल्यामुळे दोन रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर, पाच गाड्या नियोजीत वेळेपेक्षा उशीरा धावणार असल्याचे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने कळविले आहे. 

पुण्यावरून 2 वाजून 45 मिनिटांनी दौंडसाठी सुटणारी आणि दौंडवरून सायंकाळी 5 वाजून 10 मिनिटांनी सुटणारी डेमू शनिवारी रद्द करण्यात आली आहे. तसेच बारामती-पुणे आणि पुणे-बारामती पॅसेंजर दौंड ते पुणे स्टेशन दरम्यान धावणार नाही. पुणे-निजामाबाद पॅसेंजर पुणे ते दौंड दरम्यान धावणार नाही. दौंडवरून निजामाबादकडे ती नेहमीच्या वेळापत्रकानुसार जाईल. मुंबई- बंगळूर उद्यान एक्‍स्प्रेसला पुणे विभागात सुमारे अडीच तास उशीर होणार आहे. तर बंगळूर-मुंबई उद्यान एक्‍स्प्रेस दौंड स्टेशनवर सुमारे 45 मिनिटे थांबणार आहे. जम्मूतावी पुणे झेलम एक्‍स्प्रेस दौंड स्टेशनवर एक तास 20 मिनिटे थांबणार असून निजामुद्दीन-वास्को द गामा एक्‍स्प्रेस दौंड स्टेशनवर सुमारे 30 मिनिटे थांबेल. हा बदल लक्षात घेऊमन प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन मध्ये रेल्वेच्या पुणे विभागाने केले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com