भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

हडपसर पोलिसांत फिर्याद
accident
accidentSakal

उंड्री : भरधाव वाहनाच्या जोरदार धडक बसल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. मंतरवाडी-कात्रज रस्त्यावर समृद्धी हॉटेलसमोर 6 एप्रिल 2022 रोजी रात्री साडेआठच्या सुमाहास हा अपघात झाला. अपघातानंतर वाहनचालक पळून गेला.अंबादास भास्कर हंकारे (वय 34, रा. येवलेवाडी, कोंढवा) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे.अनंत हंकारे (वय 37, रा. कोंढवा, पुणे) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीचा भाऊ मंतरवाडी-कात्रज बायपास रस्त्यावरून कोंढव्यातून घरी येत होते. त्यावेळी भरधाव वाहनाची जोरदार धडक बसून अपघात झाला. फिर्यादीचा भाऊ अंबादास गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक पळून गेला. हडपसर पोलीस स्टेशन पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com