Two-wheeler Riders killed in PMP bus collision at shivaji nagar in pune
Two-wheeler Riders killed in PMP bus collision at shivaji nagar in pune

पुणे : पीएमपी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

पुणे : भरधाव पीएमपी बसने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी पहाटे दिड वाजता शिवाजीनगर येथील हवामान विभागाच्या कार्यालयासमोर घडली. याप्रकरणी पीएमपी चालकास अटक करण्यात आली आहे. 

विष्णू गुणवंत रामतिर्थे (वय 23, रा. भुतमुगळी, लातुर) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. अनिल नानासाहेब खंडागळे (वय 23, रा. हरपळे वस्ती, हडपसर) असे अटक केलेल्या चालकाचे नाव आहे.

पुण्यासह 'या' पाच ठिकाणी असणार एसटीच्या 'ई-बस चार्जिंग स्टेशन...

सहायक पोलिस निरीक्षक के.एस.राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडागळे हा वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून त्याच्या ताब्यातील पीएमपी बस भरधाव चालवित होता. रविवारी पहाटे दिड वाजण्याच्या सुमारास बस शिवाजीनगर येथील हवामान विभागाच्या कार्यालयासमोरुन जात होती. त्यावेळी रामतिर्थे त्यांच्या दुचाकीवर जात असताना भरधाव बसने त्यांना जोरदार धडक दिली. त्यामध्ये रामतिर्थे यांना जबर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी बसचालक खंडागळे यास तत्काळ ताब्यात घेतले. 

धरण होऊन नऊ वर्षे झाली, पण पाण्याचा पत्ताच नाही...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com