'गर्लफ्रेंड' सोबत फिरण्यासाठी दुचाकी चोरणारे चोरटे अटकेत 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

'गर्लफ्रेंड' सोबत फिरायला जाण्याससह मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांना गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून पिंपरी चिंचवड, पुणे शहर व पुणे ग्रामीण हद्दीतील 12 गुन्हे उघडकीस आले असून सहा लाख रुपये किंमतीच्या 14 दुचाकी जप्त केल्या आहेत. 

पिंपरी : 'गर्लफ्रेंड' सोबत फिरायला जाण्याससह मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांना गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून पिंपरी चिंचवड, पुणे शहर व पुणे ग्रामीण हद्दीतील 12 गुन्हे उघडकीस आले असून सहा लाख रुपये किंमतीच्या 14 दुचाकी जप्त केल्या आहेत. 

हिमांशु उर्फ पप्या योगेश सोंळंकी (वय 20, रा. चौधरी पार्क, गुरुव्दारा मार्ग, दिघी), निखील उर्फ सोनू संतोष जाधव (वय 19, रा.दिघी गावठाण), अशिष उर्फ अश्‍या रोहिदास जाधव (वय 21, रा. चौधरी पार्क, दिघी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

सोमाटणे फाटा येथे तीन जण थांबले असून त्यांच्याकडील दुचाकीची असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या परिसरात सापळा रचला. मात्र, पोलिसांचा सुगावा लागल्याने चोरटे पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांच्याकडे चौकशी असता त्यांच्याकडील दुचाकी चोरीची असून त्याबाबत तळेगाव दाभाडे ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर अधिक सखोल तपास केला असता त्यांनी गर्लफ्रेड सोबत फिरायला जाण्याकरीता गाडी नसल्याने तसेच मौजमजा करण्यासाठी पुणे परिसरामधुन एकुण 14 वेगवेगळया दुचाकी चोरल्याचे उघडकीस आले. चोरी केलेल्या दुचाकी ते रहात असलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर लपवून ठेवल्याचे तपासात पुढे आले. 

या आरोपींकडून दिघी, भोसरी, वाकड, तळेगाव दाभाडे, फरासखाना, हडपसर, वडगाव मावळ, विमानतळ या पोलिस ठाण्यातील 12 गुन्हे उघडकीस आले असून आरोपींकडून 14 दुचाकी जप्त केल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two wheeler thieves arrest in pune