दोन वर्षांत पिंपरी चिंचवड शहराची रया गेली : शरद पवार  

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जून 2019

पिंपरी : "काही वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवड म्हटले की, राष्ट्रवादी काँग्रेस असे चित्र होते. कारण या सुंदर शहराची उभारणी आमच्या काळात झाली आहे. मात्र, दोन वर्षांपूर्वी महापालिकेत भाजपाची सत्ता आली आणि आता नागरिकांना याची किंमत मोजावी लागत आहे.

पिंपरी : "काही वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवड म्हटले की, राष्ट्रवादी काँग्रेस असे चित्र होते. कारण या सुंदर शहराची उभारणी आमच्या काळात झाली आहे. मात्र, दोन वर्षांपूर्वी महापालिकेत भाजपाची सत्ता आली आणि आता नागरिकांना याची किंमत मोजावी लागत आहे. एकापाठोपाठ एक उद्योग बंद पडत आहेत. कामगारांचे चेहरे काळवंडले आहेत. शहराची रयाच गेली आहे,'' असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्‍त केले. 

ते म्हणाले, "शहर खूप सुंदर आहे. परंतु आता मला शहराविषयी काळजी वाटू लागली आहे. कारण, महाराष्ट्रातील मोठी औद्योगिक वसाहत इथे आहे. येथील नामांकित कंपन्या पाहण्यासाठी देशभरातून, जगभरातून लोक येत होते. परंतु, आता या कंपन्या बंद पडू लागल्या आहेत. कामगार बेकार होत आहेत. बेरोजगारांच्या हाताला काम नाही. शहरातील पहिली सरकारी कंपनी हिंदुस्थान अँटिबायोटिक्‍समधील कामगारांचे 24 महिन्यांपासून पगार झालेले नाहीत. टाटा, बजाज यासारख्या काही कंपन्यांमुळे शहर सुरू आहे. आमची सत्ता होती त्यावेळी औद्योगिक कंपन्या टिकल्या पाहिजेत, असा दृष्टिकोन होता. मात्र, आता राज्य सरकार बघायला तयार नाही. कारखानदारी बंद पडली, तर शहर उजाड होईल.'' 

पूर्वी मी अनेकदा शहरातून शहरातून जात असे. पुण्यापेक्षा पिंपरी-चिंचवडमध्ये जास्त सुधारणा केल्या आहेत. रस्ते, उड्डाणपुल, बागा झाल्या आहेत. मात्र, आता अधिकारी स्वत:हून सांगतात नेत्यांनी शहराची वाटणी करून घेतली आहे. रस्त्याच्या अलिकडे एक आणि पलिकडे एक अशी. नागरिकांच्या लक्षात आले आहे. शहर वाटपाच्या राजकारणाला जनता कंटाळली आहे. त्यामुळे महापालिकेतील 36 नगरसेवकांनी याबाबत आवाज उठवायला हवा. सभागृहात आक्रमक भूमिका घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In two years the city was destroyed: Sharad Pawar