पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत जिवंत कोंबडी, काळी बाहुली अन्...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

पुण्यात करणीच्या नावाने टाकले जाणारे हे उतारे पाहून  समाज अजून किती अंधश्रद्धेमध्ये बुडाला आहे हे दिसून येत आहे. 

पुणे : विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात अद्यापही अंधश्रद्धेचे प्रकार घडत आहेत. वैकुंठ स्मशानभूमीत कोंबडीचा उतारा टाकण्याचा प्रकार घडला आहे. 

दरम्यान, वैकुंठ स्मशानभूमीतून बाहेर पडताना गेटच्या कडेला नंदिनी जाधव यांची नजर कोपऱ्यात गेली. तेथे एक कुत्रे एका टोपलीचा वास घेत होते. नंदिनी जाधव, दीपक गिरमे व अरविंद पाखले यांनी जवळ जाऊन पाहिले तर त्या टोपलीत एक काळी कोंबडी तिचे पाय बांधून तिच्या गळ्यात काळी बाहुली लाल दोऱ्याने अडकून टाकली होती.

धक्कादायक! बर्थडे पार्टीला बोलवून त्यानं 15 मुलांना ठेवलं डांबून

एवढेच नाही तर कोंबडी पळून जाऊ नये म्हणून तिचा एक पाय मोडला होता व तिची एक वरील चोच देखील कापली होती. त्या टोपलीत भाकऱ्या, लिंबे, पोवळा, काळ्या बाहुल्या, टाचण्या इत्यादी टाकण्यात आले होते. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी कोंबडीला पहिल्यांदा बाहेर काढले तिचे पाय सोडले आणि तिला पाणीही पाजले. पण कोंबडीला तिचा एक पाय तोडल्याने उभे राहता येत नव्हते.

पुण्यात करणीच्या नावाने टाकले जाणारे हे उतारे पाहून  समाज अजून किती अंधश्रद्धेमध्ये बुडाला आहे हे दिसून येत आहे.  अशा भ्रामक अघोरी प्रथांमध्ये अडकलेल्यांना  बाहेर पाडण्याचा प्रयत्न पुणेकर करणार की नाही, असा सवाल निर्माण होत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The type of superstition in Pune

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: