पुणे पोलिसांच्या नोटिशीनंतर टायर किलर हटविले

पांडुरंग सरोदे
सोमवार, 2 एप्रिल 2018

"ऍमनोरा टाऊनशीपच्या खासगी मालकीच्या रस्त्यावर लोखंडी टायर किलर बसविल्यामुळे विद्यार्थी व नागरीकांना रस्त्यावरुन ये-जा करणे सोपे झाले होते. विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांवरही आळा बसला होता. मात्र टायर किलर बसविण्यासाठी पोलिस परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी दिलेल्या नोटीसनुसार आम्ही टायर किलर काढुन टाकत आहोत. तसेच ते पुन्हा बसविण्यासाठी रितसर परवानगी घेऊ.''
- सुनील तरटे, उपाध्यक्ष, ऍमनोरा टाऊनशीप. 

पुणे : तब्बल तीन हजार विद्यार्थी व नागरीकांच्या सुरक्षेसाठी ऍमनोरा टाऊनशीपने खासगी रस्त्यावर बसविलेले लोखंडी टायर किलर पोलिसांच्या नोटीसमुळे अखेर काढावे लागले. टायर किलर हे नागरीकांच्या जीवीतास धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे ते काढून टाकावेत, अशी नोटीस पोलिसांनी बजावली होती. दरम्यान, लोखंडी टायर किलर या अद्ययावत तंत्रज्ञानाबाबत तज्ञांकडून मार्गदर्शन घेऊ. त्यानंतर पुढील निर्णय घेण्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. 

ऍमनोरा टाऊनशीपमधील फ्युचर टॉवर समोरील अमनोरा स्कूल या शाळेमध्ये अडीच ते तीन हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थी, पालक व नागरीकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. त्यांना सुरक्षितरीत्या रस्ता ओलांडता यावा आणि विरुद्ध दिशेने येणारी वाहतुक थांबावी, यासाठी ऍमनोरा टाऊनशीप व्यवस्थापनाने सुरवातीला सुरक्षारक्षक नेमले. मात्र त्यांना लोकप्रतिनिधी, दादा, भाईंची नावे सांगून काही जणांकडून सुरक्षारक्षकांना शिवीगाळ, व मारहाण केली जात होती. हा प्रकार थांबविण्यासाठी लोखंडी "टायर किलर' बसविले होते. मात्र याबाबत पोलिसांकडे तक्रारी आल्यानंतर त्यांनी ते काढून टाकण्याचा आदेश दिल्याचे व्यवस्थापनाने सांगितले. 

"ऍमनोरा टाऊनशीपच्या खासगी मालकीच्या रस्त्यावर लोखंडी टायर किलर बसविल्यामुळे विद्यार्थी व नागरीकांना रस्त्यावरुन ये-जा करणे सोपे झाले होते. विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांवरही आळा बसला होता. मात्र टायर किलर बसविण्यासाठी पोलिस परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी दिलेल्या नोटीसनुसार आम्ही टायर किलर काढुन टाकत आहोत. तसेच ते पुन्हा बसविण्यासाठी रितसर परवानगी घेऊ.''
- सुनील तरटे, उपाध्यक्ष, ऍमनोरा टाऊनशीप. 

"ऍमनोरा टाऊनशीपमधील लोखंडी टायर किलरमुळे नागरीकांच्या जीवास धोका असून त्यामुळे अपघात होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे ते काढण्यास सांगितले आहे. मात्र हे तंत्रज्ञान नविन आहे. त्याविषयी तांत्रिकदृष्ट्या तज्ज्ञ व अभियंत्यांचे मार्गदर्शन घेऊ. त्यानंतरच पुढील निर्णय घेऊ,''
- अशोक मोराळे, पोलिस उपायुक्त, वाहतुक शाखा. 

Web Title: tyre killers removed in Amanora Park town Pune