प्रसिद्ध मृत्रविकारतज्ञ डॉ.सत्येन दोभाडा यांच्यासह अपघातात दोन जण ठार

किशोर कुदळे
रविवार, 24 जून 2018

वाल्हे  : पुणे-पंढरपुर पालखी महामार्गावरील जेऊर फाट्यानजिक दोन चारचाकी कारचा विचित्र अपघात होऊन तीन जण ठार तर आठ जण गंभीररित्या जखमी झाले. हि घटना आज पहाटे सव्वापाचच्या दरम्यान घडली. 

वाल्हे  : पुणे-पंढरपुर पालखी महामार्गावरील जेऊर फाट्यानजिक दोन चारचाकी कारचा विचित्र अपघात होऊन तीन जण ठार तर आठ जण गंभीररित्या जखमी झाले. हि घटना आज पहाटे सव्वापाचच्या दरम्यान घडली. 

आज पहाटे फलटण येथील प्रसिद्ध मुत्रविकार तज्ञ डॉ.सत्येन दोभाडा हे आपल्या हुंडाई इलेक्ट्रॉ चारचाकीमधुन जेजुरीहुन निरेकडे निघाले असता पुणे-पंढरपुर पालखी महामार्गावरील जेऊर फाट्यानजिक विराज ढाब्यासमोर निरेकडुन जेजुरीकडे चाललेली इको कार या दोन्ही चारचाकींचा जोरात विचित्र अपघात झाला. या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचा चुराडा होऊन इको कार चालक अनंत गणपत चांडोले हे जागेवर मृत पावले, तर होंडाकार चालक सुरेश कांबळे गंभीर जखमी झाला. 

अपघाताची माहिती समजताच जेजुरीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांच्यासह वाल्हे व निरा पोलिस दुरक्षेत्राचे पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना त्वरीत जवळील हॉस्लीटलमध्ये दाखल करण्यात आले. अपघातामध्ये इको कार चालक अनंत गणपत चांडोले (वय३७ रा.वेळापुर, ता.माळशिरस) हे जागीच ठार झाले. तर होन्डा कारमधील डॉ. सत्येन हुकूमचंद दोभाडा हे लोणंद येथील खाजगी हॉस्पीटलमध्ये उपचारादरम्यान मृत पावले. तर इकोकार मधील अंजली आप्पा लोकंडे ही तीन वर्षाची मुलगी जेजुरी येथील रूग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत पावली. इकोकारमध्ये दहा प्रवासी तर हुंडाई इलेक्ट्रॉमध्ये तीन जण प्रवास करत होते. यामध्ये अपघातामध्ये इको कारमधील सोमनाथ विठ्ठल मोहित, गणेश आप्पा लोखंडे, साक्षी आप्पा लोखंडे, दिपाली गणेश जाधव, आशा अनिल भानवसे, रंजना विठ्ठल मोहित हे सर्व राहणार वेळापुर (ता.माळशिरस, जि. सोलापुर) तर हुंडाई इलेक्ट्रॉकारमधील चालक सुरेश नारायण कांबळे व सहप्रवाशी बापू रोहिदास कांबळे हे जखमी असुन अपघातातील जखमींना जेजुरी व लोणंदयेथील खाजगी रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

या अपघातामध्ये एकुण तीन मयत तर आठ जण जखमी झाले असुन पहाटेच्या वेळी हा विचित्र अपघात झाला असुन अपघात नेमका कसा झाला हे तपासाचे काम सुरू असल्याची माहिती जेजुरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांनी दिली.घटनास्थळी वाल्हे व निरा पोलिस दुरक्षेत्राचे बनकर, संदिप पवार, किसन कानतोडे आदिं उपस्थित होते.

 

Web Title: tywo die in an accident along with famous scientist Dr. Satyen Dobhada