कुटुंबीयांनी नाकारले; मात्र, वृद्धाश्रमाने दिली जगण्याची नवी उमेद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ganga Tara Vruddhashram

कुटुंबीयांनी नाकारले आणि जगण्याची उमेद संपली, असे वाटत असतानाच वृद्धाश्रमाची वाट धरली. मात्र, वृद्धाश्रमात फक्त निवाराच नाही, तर मान-सन्मान माया-ममता भेटली आणि पुन्हा नव्याने नवी पहाट उजाडली.

Ganga Tara Vruddhashram : कुटुंबीयांनी नाकारले; मात्र, वृद्धाश्रमाने दिली जगण्याची नवी उमेद

उंड्री - कुटुंबीयांनी नाकारले आणि जगण्याची उमेद संपली, असे वाटत असतानाच वृद्धाश्रमाची वाट धरली. मात्र, वृद्धाश्रमात फक्त निवाराच नाही, तर मान-सन्मान माया-ममता भेटली आणि पुन्हा नव्याने नवी पहाट उजाडली, असा सूर गंगातारा वृद्धाश्रमातील निराधार महिलांनी आळवला.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वडकी (ता. हवेली) येथील गंगातारा वृद्धाश्रमाला शेड बांधून दिले. याप्रसंगी निर्मला तापकीर, मुकेश झा, वर्धन शर्मा, अनुष्का द्विवेदी, अनुपम चांडक, शिवराजू आदी मान्यवर उपस्थित होते.

अॅड. लक्ष्मी माने म्हणाल्या की, महिलांचा एक दिवस नाही, तर दररोज आणि तोही निराधार महिलांना सन्मान देण्याची गरज आहे. वृद्धाश्रमामध्ये आलेल्या महिलांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहताना समाधान वाटते. मात्र, ज्या दिवशी रानावनात आणि रस्त्यावर पोटपूजेसाठी काम करणाऱ्या महिलांनाही चांगली वागणूक मिळेल, त्य़ावेळी महिला दिन साजरा केल्याचे समाधान वाटेल, असे त्यांनी सांगितले.

गंगाताराच्या संस्थापिका नीता भोसले यांनी मान्यवरांचे स्वागत करून आभार मानले.

टॅग्स :punewomenDestitute