उपवासकर्त्यांसाठी खूशखबर...

Khichadi
Khichadi

मार्केट यार्ड - मार्गशीर्ष हा उपवासाचा महिना मानला जातो. या महिन्यात शेंगदाणा, साबूदाणा, भगर आदींच्या मागणीत आणि भावात वाढ होते. यंदा मात्र साबूदाणा, भगर आणि शेंगदाण्याच्या भावात घट झाली आहे. त्यामुळे नागरिकांचा उपवास स्वस्त झाला आहे.

घाऊक बाजारात नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत साबूदाणा आणि भगरीच्या भावात दर्जानुसार किलोमागे ८ ते १० रुपये, तर शेंगदाण्याच्या भावात किलोमागे तीन ते पाच रुपयांची घट झाली आहे. किरकोळ बाजारात साबूदाणा ६३ ते ६५ रुपये, भगर ७० ते ७५ आणि शेंगदाणा ७६ ते ८२ रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. 

मार्केट यार्डातील बाजारात तमिळनाडूतील सेलम जिल्ह्यातून नवीन हंगामातील साबूदाण्याची आवक सुरू झाली आहे. साबूदाण्याची सध्या दररोज ८० ते १०० टन आवक होत आहे. नाशिक येथून भगरीची दररोज ८ ते १० टन आवक होत आहे. आवक वाढल्याने या मालाच्या भावात घट झाली. साबूदाणा आणि भगरीचा हंगाम डिसेंबरमध्ये सुरू होऊन जानेवारीत संपतो, अशी माहिती व्यापारी आशिष दुगड यांनी दिली.

गुजरातमधून घुंगरू शेंगदाण्याची सध्या आवक होत आहे. आंध्र प्रदेशातून आणि कर्नाटकातून गेल्या १५ दिवसांपासून नवीन हंगामातील घुंगरू शेंगदाण्याची आवक सुरू आहे, त्यामुळे भावात घट झाल्याचे व्यापारी अशोक लोढा यांनी सांगितले.

घाऊक बाजारात साबूदाण्याचा भाव (प्रतिकिलो)
१. साबूदाणा एक्‍स्ट्रा सुपर फाइन 

- नोव्हेंबर - ७० रुपये
- डिसेंबर - ६० रुपये

२. साबूदाणा फाइन
- नोव्हेंबर - ६८ रुपये
- डिसेंबर - ५८ रुपये

१. भगर  
नोव्हेंबर - ८० रुपये
डिसेंबर - ७० रुपये

शेंगदाणे  
१. गुजरात जाडा 

- नोव्हेंबर - ७२ ते ७५ रुपये
- डिसेंबर - ६८ ते ७१ रुपये

२. गुजरात भारी घुंगरू
- नोव्हेंबर - ७५ ते ७७ रुपये
- डिसेंबर - ७१ ते ७३ रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com