शेतकरी संपामुळे सरकार अडचणीत - राजू शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 जून 2017

उदापूर - शेतकऱ्यांच्या संपामुळे सरकार अडचणीत आले असून, घाबरले आहे; मात्र ते न घाबरल्याचा आव आणते आहे, अशा शब्दांत खासदार राजू शेट्टी यांनी भाजप सरकारचा समाचार घेतला. कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण केले नसल्यामुळेच शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक होऊन त्याची परिणती संपात झाली आहे. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी सरकारने लागू केल्या असत्या, तर शेतकऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळच आली नसती. सरकारच्या दुटप्पी धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केली.

पिंपरीपेंढार (ता. जुन्नर) येथे शेतकरी संपादरम्यान गुन्हा दाखल झालेल्या ५८ शेतकऱ्यांची, भेट घेण्यासाठी ते बुधवारी रात्री ११ वाजता आले होते.

शेट्टी म्हणाले, ‘‘सरकार एकीकडे आंदोलनाच्या काळात तीनशेहून अधिक बाजार समित्या सुरू असल्याचे सांगते, तर दुसरीकडे आंदोलनादरम्यान २७८ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगते. सरकारचा हा दुटप्पीपणा शेतकऱ्यांच्या लक्षात आला आहे.’’

ते म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. शेतकऱ्यांवर आंदोलनादरम्यान गुन्हे दाखल झाले असून, माझ्यावरही ३२ गुन्हे दाखल आहेत.’’

Web Title: udapur pune news Government crisis due to farmers strike