तबला-बासरीची जुगलबंदी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

पुणे - संगीतकार व तबलावादक उदय रामदास देशपांडे यांच्या संगीतरचनांचा अनोखा आविष्कार रसिकांनी नुकताच अनुभवला. वाइड विंग्ज व पद्मा एंटरटेनमेंट यांच्या वतीने या अनोख्या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. यात विविध सांगीतिक रचनांचा आस्वाद रसिकांनी घेतला. 

या मैफलीत मल्हार, यमन अशा विविध रागांचे सादरीकरण करण्यात आले. मृण्मयी फाटक, हरिदास शिंदे व जयदीप वैद्य यांनी विविध गीते सादर केली. संत मीराबाई यांच्या भक्तिपर गीतांना रसिकांनी भरभरून दाद दिली; तर ‘रंग ना डारो मुझ पे श्‍याम’ या होरी गीतावर रसिकांनी ताल धरला. मृण्मयी पाठक यांच्या हंसध्वनी या रागातील तराण्याला रसिकांनी दाद दिली. 

त्यानंतर तबला, बासरी यांची जुगलबंदी रसिकांना अनुभवता आली. त्यांना अनय गाडगीळ (की बोर्ड), रितेश ओहोळ (गिटार), केशव आयंगार (बास गिटार), सुनील अवचट (बासरी), अभिषेक भुरुक (ड्रम), नागेश भोसेकर (टाळ) आणि उदय रामदास (तबला) यांनी साथसंगत केली.

Web Title: Uday Deshpande Music