चंद्रकांत पाटलांमुळे उदयनराजेंचा भाजप प्रवेश लांबणीवर

सागर आव्हाड
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

उदयनराजे भोसले यांच्या भविष्यातील राजकारणाविषयी आज (सोमवार) निर्णय होण्याची शक्यता होती. पुण्यात आज होणारी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठक रद्द झाली असून, आता त्यांचा भाजप प्रवेश पुन्हा लांबणीवर पडला आहे. आज ते मुंबईला रवाना होणार आहे. तेथे काही निर्णय होण्याची शक्यता आहे. 

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे यांचा भाजप प्रवेश जवळपास लांबणीवर पडल्याचे चित्र असून, त्याला कारण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील असल्याचे बोलले जात आहे. 

उदयनराजे भोसले यांच्या भविष्यातील राजकारणाविषयी आज (सोमवार) निर्णय होण्याची शक्यता होती. पुण्यात आज होणारी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठक रद्द झाली असून, आता त्यांचा भाजप प्रवेश पुन्हा लांबणीवर पडला आहे. आज ते मुंबईला रवाना होणार आहे. तेथे काही निर्णय होण्याची शक्यता आहे. काही कार्यकर्त्यांनीही त्यांना भाजपमध्ये न जाण्याचे आवाहन केले आहे. तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल, असे त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. मात्र, उदयनराजेंनी अद्याप राजीनामा दिला नसल्याने भाजपमध्ये जाण्याबाबत ठाम काही सांगता येत नाही. 

चंद्रकांत पाटलांनी यापूर्वीही त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत वक्तव्ये केलेली होती. उदयनराजे भाजपमध्ये आले तर पश्चिम महाराष्ट्रातील चंद्रकांत पाटलांचे भाजपमधील वर्चस्व कमी होईल, अशी शक्यता कमी होईल. उदयनराजेंच्या नावामागे ग्लॅमर असल्याने चंद्रकांत पाटलांचे पक्षातील स्थान कमी होईल, अशा शक्यता असल्याने त्यांचा प्रवेश लांबणीवर पडल्याचे सांगण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udayanraje Bhosale enters BJP is extended due to Chandrakant Patil