उंडवडी सुपेकरांची पालखीच्या स्वागतासाठी जय्यत तयारी

विजय मोरे
बुधवार, 11 जुलै 2018

उंडवडी - संत श्रेष्ठ तुकाराममहाराज पालखी सोहळा (ता. 12) सायंकाळी उंडवडी सुपे (ता. बारामती) येथे मुक्कामी येत आहे. यापार्श्वभूमीवर उंडवडी सुपेकरांच्या वतीने पालखी सोहळ्याच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. गुरुवारी सायंकाळी संत श्रेष्ट तुकाराम महाराज पालखी सोहळा दौंड तालुक्याला निरोप देवून बारामती तालुक्यात प्रवेश करणार आहे. बारामती तालुक्याच्या वतीने प्रशासन व पदाधिकारी स्वागत करणार आहेत.  

यामध्ये वारकऱ्यांना शुध्द पाणी पुरविणे, दिंडीसाठी वीज व्यवस्था पुरविणे, पालखी तळावर 1800 स्केअर फूट मंडप उभारणे, स्वयंपाकासाठी किचेन शेड, वैयक्तिक शौचालये वारकऱ्यांना दिसावे, यासाठी पांढरे झेंडे लावणे, व पालखी तळ व गावठान परिसराची स्वच्छता, आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे,  सार्वजनिक पाण्याच्या टाकीची साफसफाई, फिरते शौचालय साफसफाई, सी. सी. टि व्ही कॅमेरे, रंगरंगोटी तसेच चर शौचालय उभारणे आदी बाबींचे ग्रामपंचायतीकडून नियोजन करण्यात येत आहे. तसेच येथील पालखी कट्याला रंगरंगोटी करण्यात आली आहे. येथील बहुतांशी कामे युध्दपातळीवर पूर्ण करण्यात आली आहेत. 

दोन वर्षापूर्वी येथील पालखी तळ परिसरात जागा कमी पडू नये, यासाठी सखल भागात ग्रामपंचायतीच्या वतीने मुरूम टाकून सपाटीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे खड्यातील जागेवर मोठ्या प्रमाणात मैदान उपलब्ध झाले आहे. येथील सर्व कामे अंतिम टप्यात आहेत. अशी माहिती सरपंच एकनाथ जगताप, उपसरपंच पोपट गवळी व ग्रामसेवक विनोद आटोळे यांनी दिली.

प्रशासनही तत्पर .. 
गेली तीन दिवस उंडवडी सुपे परिसरात आरोग्य विभाग व महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी तसेच गटविकास अधिकारी प्रमोद काळे , तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश जगताप, पाणी पुरवठ्याचे उपअभियंता बाळासाहेब सानप यांच्यासह कर्मचारी सातत्याने प्रत्येक बारीक सारीक गोष्टीवर लक्ष घालून काम करत आहेत. त्यामुळे प्रशासनाकडूनही मोठी तयारी झाली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udayavadi preparation for the welcome of Palkhi