Narayan Rane : "ठाकरे मातोश्रीचे मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे नव्हे"; नारायण राणेंची सडकून टीका

पुणे दौऱ्यात नारायण राणेंनी दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या आठवणींनाही दिला उजाळा
uddhav thackeray narayan rane
uddhav thackeray narayan ranesakal News

पुणे दौऱ्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. उद्धव ठाकरे मातोश्रीचे मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे नाही, अशा शब्दांत त्यांनी टीका केली. (Uddhav Thackeray was CM of Matoshree not Maharashtra Criticism by Narayan Rane)

uddhav thackeray narayan rane
Sambhaji Nagar Violence: छत्रपती संभाजी नगरमधील परिस्थिती कशी? CM शिंदेंनी दिली माहिती

राणे म्हणाले, पुण्यात अनेक प्रश्न आहेत तरी ठाकरे गटाबद्दल मला का प्रश्न विचारले जात आहेत. ठाकरे गट, मातोश्री एवढाच महाराष्ट्र आणि भारत आहे का? काय राहिलंय ठाकरे संपले आता? यापूर्वी ते अडीच वर्षे मुख्यमंत्री होते ते मातोश्रीचे होते महाराष्ट्राचे नव्हते.

uddhav thackeray narayan rane
MNS Vasant More: वसंत मोरेंविरोधात पक्षांतर्गत षडयंत्र? नव्या घटनेवरुन व्यक्त केली जाहीर नाराजी

छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या हिंसाचारावर विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी आपण या प्रकरणी काही बोलणार नाही असं सांगितलं तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे प्रकरण सांभाळतील, असंही राणे यावेळी म्हणाले.

हे ही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

गिरीश बापटांच्या आठवणींना दिला उजाळा

दरम्यान, नारायण राणे यांनी भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या आठवणींनाही उजाळा दिला. बापट १९९५ साली आमदार म्हणून सभागृहात आले तेव्हा मी स्वतः आमदार होतो. मी शिवसेनेत होतो आणि भाजप सोबत आमची युती होती. विधिमंडळाच्या कामात ते रस घायचे. गिरीश भाऊ गेल्यामुळं आता पोकळी निर्माण झाली आहे. यामुळं भाजपचं मोठं नुकसान झालं असून यातून पक्ष बाहेर येईल पण त्यांच्या कुटुंबीयांना यातून बाहेर येण्यासाठी देव ताकद देवो. भाऊंना जेव्हा पहिल्यांदा हार्ट अटॅक आला तेव्हा मला नातू झाला होता, तेव्हा खूप वाईट वाटत होतं मला, अशा काही आठवणी देखील यावेळी राणेंनी सांगितल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com