पुणे : सत्तास्थापनेनंतर पहिल्यांदाच मोदी-ठाकरेंची भेट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

महाराष्ट्रातील मोठ्या सत्तानाट्यानंतर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर ते आज पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज (ता.०६) लोहगाव विमानतळावर भेटले.

पुणे : महाराष्ट्रातील मोठ्या सत्तानाट्यानंतर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर ते आज पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज (ता.०६) लोहगाव विमानतळावर भेटले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

पंतप्रधान मोदींच्या स्वागताला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही पुणे विमानतळावर उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांचे एकत्र स्वागत केले. यावेळी केंद्रिय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हेदेखिल उपस्थित होते. मोदींच्या स्वागतानंतर उद्धव ठाकरे पुणे विमानतळावरून एअर फोर्स स्टेशनकडे रवाना झाले.

Image may contain: 4 people, people standing

कांदा न खाल्ल्याने कोणीही मरत नाही - बच्चू कडू 

दरम्यान, पाषाण येथील भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेमध्ये (आयसर) तीन दिवसीय वार्षिक पोलिस महासंचालक परिषदेला (डीजी कॉन्फरन्स) शुक्रवारपासून कडेकोट पोलिस बंदोबस्तात सुरूवात झाली. राष्ट्रीय सुरक्षेसंबंधीच्या या परिषदेला पहिल्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उपस्थिती लावून मार्गदर्शन केले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवारी व रविवारी या परिषदेला मार्गदर्शन करणार आहेत. त्यासाठी आज रात्री सव्वा दहा वाजता लोहगाव विमानतळावर त्यांचे आगमन झाले.

Image may contain: 3 people, people smiling, people standing


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udhhav to meet PM Modi for first time post Govt formation