बोरीबेल रेल्वे स्थानकावर उद्यान एक्सप्रेसच्या धडकेत दोन ठार; ग्रामस्थांचे आंदोलन

प्रफुल्ल भंडारी 
रविवार, 6 ऑगस्ट 2017

बोरीबेल (ता.दौंड ) रेल्वे स्थानकावर उद्यान एक्सप्रेस खाली सापडून एका बालकासह एकूण दोन जण ठार झाले आहेत.
 

दौंड : बोरीबेल (ता.दौंड ) रेल्वे स्थानकावर उद्यान एक्सप्रेस खाली सापडून एका बालकासह एकूण दोन जण ठार झाले आहेत.

सुरेश भिकाजी सूर्यवंशी ( वय ५२) व कार्तिक अमोल खलदकर ( वय ७, दोघे रा. बोरीबेल, ता. दौंड) अशी मृतांची नावे आहेत. आज (ता.६) दुपारी १ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास सुरेश भिकाजी सूर्यवंशी व अमोल खलदकर हे लोहमार्ग ओलांडून बोरीबेल गावाकडे निघाले असता  हा प्रकार घडला. बेंगलुरु - मुंबई उद्यान एक्सप्रेस खाली सापडल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकारानंतर संतप्त ग्रामस्थांनी रेल रोको आंदोलन सुरु केल्याने सोलापूर - दौंड व दौंड - सोलापूर दरम्यानच्या प्रवासी गाड्यांचे वेळापत्रक  विस्कळित झाले आहे. ग्रामस्थांनी दोन्ही मृतदेह लोहमार्गातून उचलण्यास नकार देत आंदोलन सुरू आहे.

Web Title: udyan express accident two dead esakal news