...चला नदीची पुण्याई राखूया!

file photo
file photo

यूएफएलसी संस्थेचे सकारात्मक पाऊल
पुणे : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुणे शहरातील मुळा-मुठा नदीचे आजचे चित्र अतिशय दुर्दैवी असून, सरकार आणि प्रशासनावर टीका करण्यापेक्षा एक जागरूक पुणेकर या नात्याने आपणच याबाबत जबाबदारी घेण्याची गरज आहे. नदी स्वच्छ करण्यासाठी UFLC या संस्थेने पहिले सकारात्मक पाऊल उचलले आहे.

शहरातील मध्यवर्ती भागातून मुळा-मुठा वाहत आहे; पण या नद्यांतून स्वच्छ पाण्याऐवजी सांडपाणी वाहताना दिसते. नदीकडे पाहून अनेक जण नाकं मुरडताना दिसतात; परंतु, नदी स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रशासनासह सर्वच पुणेकरांची आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नदी स्वच्छता व नदीकिनारा सौंदर्यीकरणाचा निर्णय UFLC या संस्थेने घेतला आहे. बुधवारी (ता. 5) सकाळी आठ वाजता ओंकारेश्वर मंदिरापासून स्वच्छता मोहीम हाती घेण्यात येणार आहे. संपूर्ण नदीचे शुद्धीकरण मोठे आव्हान असल्यामुळे ओंकारेश्वर मंदिर ते महापालिका पुलादरम्यान स्वच्छता करण्यात येणार आहे. या भागाचा कायापालट झाल्यानंतर उदाहरण समोर ठेऊन नदीचा पुढील भाग स्वच्छ करण्यात येणार आहे. या मोहिमेत पुणेकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

दरम्यान, पुण्यातील सर्वांच्या घरातील स्वच्छतागृह आणि बाथरूममधून रोज बाहेर पडणारे 347 दशलक्ष लिटर सांडपाणी थेट नदीत सोडले जात असल्याने महाराष्ट्र प्रदूषण मंडळातर्फे (एमपीसीबी) पुणे महापालिकेला रोज 34 लाख 70 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येत आहे. आतापर्यंत 15 कोटी रुपयांचा दंड मंडळाने वसूल केला आहे.

संस्थेची उद्दिष्टेः
* नदीकाठावर साठलेला सुका कचरा नष्ट करणे.
* कमी खर्चामध्ये पाण्याचे शुद्धीकरण करणे.
* वृक्षारोपण व नदीकाठचे सौंदर्यीकरण करणे.
* नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करणे.
* नदीच्या प्रदूषणाचे संशोधन करणे.

अधिक माहितीसाठी संपर्क ः 9049487936, 9370754519, 8698417836

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com