उजनी धरण "काठावर पास' 

प्रा. प्रशांत चवरे
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे उजनी धरणातील पाणीपातळीमध्ये समाधानकारक वाढ झाली आहे. धरण मंगळवारी (ता. 30 जुलै) "प्लस'मध्ये (उपयुक्त साठा) आले. आज धरणात उपयुक्त पाणीसाठा 36.25 टक्के (19.42 टीएमसी) झाला असून, एकूण साठा 83.07 टीएमसी झाला आहे. त्यामुळे धरण 15 ऑगस्टपूर्वी भरण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

धरणातील उपयुक्त साठा 36 टक्‍क्‍यांवर 

भिगवण (पुणे) : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे उजनी धरणातील पाणीपातळीमध्ये समाधानकारक वाढ झाली आहे. धरण मंगळवारी (ता. 30 जुलै) "प्लस'मध्ये (उपयुक्त साठा) आले. आज धरणात उपयुक्त पाणीसाठा 36.25 टक्के (19.42 टीएमसी) झाला असून, एकूण साठा 83.07 टीएमसी झाला आहे. त्यामुळे धरण 15 ऑगस्टपूर्वी भरण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

पुणे, नगर व सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी, उद्योजक व सामान्य नागरिकांसाठी उजनी धरण अत्यंत महत्त्वाचे आहे. चालू वर्षी पुणे जिल्ह्यातील इंदापूर व दौंड, नगर जिल्ह्यातील कर्जत आणि सोलापूर जिल्ह्यातील करमाळा आदी तालुक्‍यांमध्ये समाधानकारक पाऊस झाला नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांची नजर उजनी धरणावर होती. 27 जुलैअखेर धरणांमध्ये वजा 26 टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे लाभ क्षेत्रामध्ये खरिपाच्या पीक लागवडीवर मोठा परिणाम जाणवत होता. पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे उजनी धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. 

उजनी धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता 117 टीएमसी आहे. त्यापैकी 63.65 टीएमसी मृत; तर 53.57 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. आज धरणात उपयुक्त पाणीसाठा 36.25 टक्के (19.42 टीएमसी) झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ujani Dam passes on edge