उजनीची वाटचाल शंभरीकडे

मनोज गायकवाड 
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

अकलूज : आज सायंकाळी 6 वाजता उजनी धरणात 65.39 टक्के पाणीसाठा झाला असून दौंड येथून उजनी धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी येत आहे. याचा विचार करता उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याचा इशारा धरण प्रशासनाने दिला आहे.
उजनीच्या वरील धरणे भरली आहेत आणि भीमा खोऱ्यात चांगला पाऊस सुरु आहे. त्यामुळे उजनीत मोठ्या प्रमाणावर पाणी येत आहे. 

दौंड येथून 53,990 क्युसेक्स इतक्या वेगाने पाणी येत आहे. याचवेळी बंडगार्डन येथून 36,608 क्युसेक्सचा विसर्ग उजनीच्या दिशेने येत आहे. उजनीच्या वरील धरणांची साठवण क्षमता संपली आहे या परिस्थितीत तेथे पडणाऱ्या पावसाचे पाणी उजनीत येत आहे. पुणे परिसरात सद्या चांगला पाऊस सुरु आहे.  उजनीत मोठ्या प्रमाणावर पाणी येत आहे. ही परिस्थिती पाहता उजनी धरण लवकरच 90 टक्के भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे संभाव्य पूर नियंत्रणाची स्थिती लक्षात घेता उजनीतून कोणत्याही क्षणी भीमा नदीत पाणी सोडले जाईल अशा इशारा धरण प्रशासनाने दिला असून नदीकाठावर ही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

भीमेला पूर येण्याची शक्यता

निरा खोऱ्यातील देवधर, भाटघर, गुंजवणी व वीर ही चार ही धरणे भरली आहेत. त्या परिसरात चांगला पाऊस सुरु आहे त्यामुळे सायंकाळी सहा वाजता वीर धरणातून 23,185 क्युसेक्सचा विसर्ग निरा नदीत सोडला जात आहे. हे पाणी संगम (ता. माळशिरस) येथून भीमा नदीत जात आहे. निरेतील प्रवाहामुळे सद्या भीमा नदी दुथडी भरुन वहात आहे. अशातच उजनीतून पाणी सोडावे लागले तर भीमा नदीला पूर येण्याची शक्यता आहे.

Web Title: Ujani Dam will 100 present full