सायकलवेड्या कुटुंबाचा आनंददायी जीवनप्रवास 

ulhas-joshi
ulhas-joshi

पुणे - भटकंतीतून शारीरिक व्यायाम, निसर्गात वावरण्याची मौज, गावोगावी मित्रं जोडण्याचा आनंद, छायाचित्रणांतून आठवणींचं धन गोळा करणं, पर्यावरणस्नेही वाटचाल अशा अनेक गोष्टी ते सायकलवरील प्रवासातून साधतात. पुण्यातील उल्हास जोशी, त्यांच्या पत्नी गायत्री, मुलगा नचिकेत व मुलगी पद्मिनी हे सगळे मनमुराद सायकल चालवतात. "जीवनाचा प्रवास आनंददायी करण्यासाठी सायकल प्रवास,' असं त्यांचं सूत्र आहे. 
.. 
उल्हास जोशी म्हणाले, ""लहानपणी वडिलांना सायकल चालवताना पाहायचो. आईही सायकल चालवायची. मी नऊ - दहा वर्षांचा असताना तेव्हा जवळपास निर्मनुष्य असलेल्या सिंहगड रस्त्यावर सायकलने गेलो. त्यामुळे आत्मविश्वास वाढला. तेव्हापासून गेली पन्नास वर्षे मी भरपूर सायकलिंग करत आहे. गायत्रीशी लग्न ठरल्यापासून आम्ही जोडीने सायकलवरून खूप भटकलो. हनिमूनला महाबळेश्वरलाही सायकलने गेलो. मुलांनाही सायकलीची गोडी लागली. मुलांबरोबरच त्यांचे जीवनसाथीही यात सामील झाले. दरवर्षी भारतातील एका राज्याची सफर मी आणि माझी पत्नी सायकलीवर करतो. आता केवळ सहाच राज्यं राहिली आहेत. प्रसिद्ध स्थलदर्शनाएवढंच महत्त्व आम्ही खेडोपाडी फिरण्याला देतो. कुठल्याही छोट्याशा गावात गेल्यावर गावकऱ्यांना जमवून गप्पांच्या माध्यमातून अनेक गोष्टी जाणून घेतो. आमच्याकडील उपयुक्त माहिती त्यांना पुरवतो. असा विस्तृत गोतावळा निर्माण झाला आहे.'' 

जोशी यांनी असंही सांगितलं की, पत्नीबरोबर मी वर्षातून एकदा कोणत्या तरी एका देशात जातो. मध्यंतरी युरोपमध्ये पोहोचल्यावर तेथील स्पेन, फ्रान्स व जर्मनी या देशांमधील पर्यटन सायकलवरून केलं. एकदा मी पुणे - श्रीलंका - पुणे हा सहा हजार किलोमीटरचा प्रवास सायकलने केला. दर रविवारी सायकलने पन्नास किलोमीटर करण्यासाठी लोकांना खुलं आमंत्रण असतं. खूपजण यात सहभागी होतात. दरवर्षी हिमालयातील सायकल सफारी ठरलेलीच असते. यात अनेकजण खडतर मार्गांवरचा प्रवास सायकलने माझ्यासोबत करतात. शारीरिक व्यायाम, फिरण्यातली मौज, निसर्गमैत्री घडवण्यासाठी सायकल हे अप्रतिम माध्यम आहे. पर्यावरणाला बाधा न आणता आपण यातून बरंच काही मिळवतो. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com