अनुवादामुळे साहित्यकृती अधिक जवळ - उमा कुलकर्णी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 डिसेंबर 2019

संमेलन दृष्टिक्षेपात
उद्‌घाटक : प्रवीण दवणे
किती वाजता : सकाळी साडेनऊ
समाजाभिमुखता परिसंवाद : दुपारी १२
मनोरंजन : बहुभाषिक गाण्यांची मैफील
काव्यानुवाद स्पर्धेचे पारितोषिक वितरण ठराव मंजुरीनंतर समारोप

पुणे - ‘विविध भाषांतील साहित्य आणि विचार वाचकांपर्यंत पोचविण्यासाठी अनुवाद हे चांगले माध्यम आहे. त्यासाठी अनुवादकांची मोठी फळी निर्माण झाली पाहिजे,’’ असे मत तिसऱ्या विचार भारती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा उमा कुलकर्णी यांनी व्यक्‍त केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, भारतीय विचार साधना आणि विश्‍वसंवाद केंद्र यांनी हे संमेलन आयोजित केले आहे. त्याचे उद्‌घाटन शनिवारी (ता. ७) घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर कुलकर्णी यांच्याशी ‘सकाळ’ने संवाद साधला. 

कुलकर्णी म्हणाल्या की, सध्याचा वाचक हा सर्वार्थाने सुबुद्ध झाला आहे. जागतिक ज्ञानाच्या दृष्टीने तो बहुश्रुतही होत आहे. तो प्रवास खूप करतो आहे. यातून त्याची साहित्यिक आणि वैचारिक भूक वाढू लागली आहे. त्यासाठी साहित्य आणि वाचनसंस्कृती जोडण्यासाठी अनुवादाचे महत्त्व मोठे आहे. 

तिसऱ्या विचार भारती संमेलनाच्या अध्यक्षपदी एका अनुवादकाची निवड झाली. ही बाब अनुवादाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा निकोप होत चालल्याचे निदर्शक आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. जगभरातील सर्वच भाषा एका व्यक्तीला येत नाहीत. त्यामुळे त्या भाषेतील विचार हा अन्य भाषेत प्रवाही करण्याचे सामर्थ्य हे अनुवादात असते, असे सांगून कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘अनुवादाचे काम हे गंभीरपणे झाले पाहिजे. कारण, अनुवादातून दुसऱ्या भाषेत जाणारा विचार तेवढाच शुद्ध अर्थाचा असला पाहिजे. त्यात चूक झाली, तर मोठाच गोंधळ होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे अनुवाद ही महत्त्वाची जबाबदारी 
आहे.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uma Kulkarni Interview