चतुःश्रूंगी पोलिसांकडून भेसळयुक्त खवा जप्त

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

औंध - गुजरातहून पुण्यात भाग्यलक्ष्मी ट्रॅव्हल्स या खाजगी वाहतुक करणा-या बस 
मधून आणला जाणारा भेसळयुक्त खवा चतुःश्रूंगी पोलिसांनी पकडला. तसेच तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

अहमदाबाद येथून पुण्यात प्रवाशी वाहतुक करणारी खाजगी बस (जीजे 03 बीटी 9920) बालेवाडी पिएमपीएल आगाराजवळ आली असता पोलिसांना संशय आल्याने झडती घेतली. चतु:श्रूंगी पोलिस ठाण्याचे कर्मचारी प्रकाश आव्हाड, तेजस चोपडे व सारस साळवी यांना गाडीत खवा असल्याचे आढळून आले. तपासणीअंती हा खवा भेसळयुक्त असल्याचा संशय आल्याने संबंधित गाडी पोलिस ठाण्यात आणून संबंधित गाडीचे चालक व वाहक यांना ताब्यात घेण्यात आले. 

यामध्ये इंद्रसींग कल्याणसींग चावडा (36), करणसींग तकतसींग चौहान 38) या दोन चालकांसह क्लिनर नेपालसींग मानसींग चौहान (28) या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीवरून अहमदाबाद येथून हा खवा पुण्यात आणण्यात आला असून, त्याचे वजन सुमारे दिड हजार किलो आहे. यासंदर्भातील माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांना कळवण्यात आल्यानंतर खव्याची पाहणी  करून पुढील तपास संबंधित अधिकारी करत आहेत. हा खवा नेमका कुणी व कुणासाठी पुण्यात आणला याचा तपास चतु:श्रूंगी पोलिस करत आहेत.

Web Title: unauthorized khawa sneezed by chatushrungi police