सख्खा काका पक्का वैरी; पुतणीवर अत्याचार करून केला खून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

पिंपरी : अडीच वर्षांच्या मुलीवर सख्ख्या चुलत्यानेच लैगिंक अत्याचार करून खून केल्याचा प्रकार पोलिसांच्या तपासात उघड झाला आहे. पिंपळे सौदागर येथील कामगार वसाहत येथे मंगळवारी (ता . 23) ही घटना उघडकीस आली.  

पिंपळे सौदागर येथे एका इमारतीचे काम सुरू आहे. येथे पिडित मुलीचे आई वडील मजुरीचे काम करत असून  येथीलच एका पत्रशेडमध्ये हे कुटुंब राहते. तसेच पिडित मुलीचा चुलता देखील याच ठिकाणी मजुरीचे काम करतो. तो शेजारीच पत्र्याच्या शेडमध्ये रहायला आहे. 

दरम्यान, मंगळवारी पहाटे पीडित मुलगी त्यांच्या घरात आई वडिलांसोबत झोपलेली असताना तिचा चुलता घरात शिरला. अडीच वर्षीय पुतणीचे अपहरण करून तिच्यावर लैगिक अत्याचार केला त्यानंतर गळा दाबून खून करून मृतदेह नाल्यात फेकून दिला. 
पोलिस तपास करीत असताना हा गुन्हा पिडित मुलीच्या सख्ख्या चुलत्यानेच  केल्याचे समोर आले आहे. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले आहे .

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: uncle raped his niece and killed her at pimpri chinchwad