पुणे जिल्ह्यातील बेकऱ्यांत कमालीची अस्वच्छता

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जानेवारी 2017

पुणे - जिल्ह्यातील बेकऱ्यांमध्ये कमालीची अस्वच्छता असल्याचे चित्र अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीतून पुढे येत आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून तपासलेल्या ७५ पैकी ६५ बेकऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. कोंढव्यातील बेकरीत राहणाऱ्या कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर जिल्ह्यातील बेकऱ्यांची तपासणी करण्याची मोहीम ‘एफडीए’ने हाती घेतली आहे. पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांतही तपासणी करण्यात येत आहे. 

याबाबत अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागाचे सहआयुक्त (अन्न) शिवाजी देसाई म्हणाले, ‘‘बेकऱ्यांमधील स्वच्छतेसह कच्च्या मालाची साठवणूक, तयार माल ठेवण्याची जागा यांची तपासणी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील ७५ बेकऱ्यांची तपासणी गेल्या आठवडाभरात करण्यात आली. त्यापैकी ६५ बेकऱ्यांना नोटीस बजावली आहे. तपासण्या केलेल्यांपैकी २४ बेकऱ्या विनापरवाना चालविण्यात येत असल्याचेही या तपासणीतून पुढे आले आहे.’’ 

पुणे विभागातील १२६ पैकी १२० बेकऱ्यांना नोटीस बजावली आहे. नोटीस बजावलेल्या बेकऱ्यांना सुधारण्याची संधी दिली आहे. पंधरा दिवसांमध्ये यात सुधारणा अपेक्षित आहे. त्यासाठी अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांकडून बेकऱ्यांची फेरतपासणी करण्यात येणार आहे. त्यातील सुधारणा समाधानकारक न वाटल्यास या बेकऱ्यांचे परवाने रद्द करण्यात येणार आहेत. तसेच दंडात्मक कारवाई किंवा तडजोड दंड करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

Web Title: uncleaned in pune district bakery