‘आरटीओ’त अस्वच्छता

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

पुणे - कचऱ्याचे ढीग, दारूच्या बाटल्या, वर्षानुवर्षे पडून असलेली वाहने, साचलेले पाणी आणि त्याच्यावर घोंगावणारे डास हे चित्र प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) आवारातील आहे. अवैध वाहतूक करणारी अवजड वाहने, रिक्षा, दुचाकी, खासगी बस कार्यालयाच्या आवारात वर्षानुवर्षांपासून पडून आहेत. परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा असल्याने आग लागून मोठा धोका निर्माण होऊ शकतो. परिसरामध्ये डासांचे प्रमाणही मोठे आहे, त्यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

कार्यालयाच्या आवारात जागा कमी असून, वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, गैरसोयीच्या ठरणाऱ्या अशा सर्व बाबींकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. 

परिवहन कार्यालयाच्या आवारामध्ये मद्याच्या बाटल्या मोठ्या प्रमाणात आढळून आल्या आहेत. यावरून रात्री याठिकाणी पार्ट्या होत असण्याची शंका आहे. यातून येथे काही अनुचित प्रकारही घडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

कामानिमित्त परिवहन कार्यालयामध्ये नेहमी येत असतो. कार्यालयाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरलेली आहे. मुख्य इमारतीखाली पाणी साचलेले असते. त्यामुळे परिसरामध्ये दुर्गंधी पसरली असून, डासही मोठ्या प्रमाणात आहेत.
- अन्वर बेग, नागरिक

परिवहन कार्यालयाकडे स्वतःचे स्वच्छता कर्मचारी नाहीत. कार्यालयाच्या स्वच्छतेसाठी कंत्राट देण्यात आलेले आहे. तसेच, कार्यालयामध्ये येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असल्याने कचऱ्याचे प्रमाण अधिक आहे. परिसरामध्ये उभ्या असणाऱ्या गाड्यांची विक्री सध्या मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. तसेच महापालिकेकडेही स्वच्छतेचे काम करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.
- बाबासाहेब आजरी, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

‘आरटीओ’त पडून असलेली वाहने
वाहन    संख्या

बस    ०६
ट्रक    ०६
टॅक्‍सी    ०६
स्कूल बस    १०
टॅम्पो    ०९
टॅंकर    ०३ 
छोटी वाहने    १३
दुचाकी    १८८
एकूण    २४१

Web Title: Uncleaned RTO