अपूर्ण इमारतीचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्‌घाटन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

पुणे - राष्ट्रपतींच्या शिष्टाचारात त्रुटी राहिल्यामुळे अडचणीत आलेल्या पुणे महापालिकेने आता उपराष्ट्रपती यांच्या हस्ते आवारात बांधलेल्या नवीन इमारतीच्या उद्‌घाटनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. वास्तविक इमारतीचे काम पूर्ण झालेले नाही. असे असतानाही उद्‌घाटन करण्यात येत असल्यामुळे त्या कार्यक्रमातून नवीन अडचण उभी राहणार नाही ना, अशी भीती आता प्रशासनाकडून व्यक्त केली जाऊ लागली आहे.

महापालिकेच्या वतीने वाडिया कॉलेजजवळील उद्यानात उभारण्यात आलेल्या रमाबाई आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम नुकताच राष्ट्रपतींच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमात महापालिकेकडून शिष्टाचाराचे पालन झाले नसल्यामुळे राष्ट्रपती कार्यालयाकडून या संदर्भात खुलासा मागविण्यात आला. त्यामुळे महापालिका अडचणीत आली आहे. असे असताना आता उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या हस्ते महापालिकेच्या आवारात बांधण्यात आलेल्या विस्तारित इमारतीच्या उद्‌घाटनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम २१ जून रोजी होणार आहे.

सारे काही कोनशिलेवरील नावासाठी
या संदर्भात माहिती घेतली असता, संपूर्ण इमारतीचे उद्‌घाटन न करता वरील मजल्यावर उभारण्यात आलेल्या सभागृहाचे आणि पदाधिकाऱ्यांच्या कक्षांचे उद्‌घाटन होणार आहे, असे सांगण्यात आले. परंतु उपराष्ट्रपती नायडू यांच्या दौऱ्यात इमारतीचे उद्‌घाटन असा उल्लेख असल्याचे स्पष्ट नमूद आहे. पदावरून दूर जाण्यापूर्वी कोनशिलेवर आपले नाव असावे, असा आग्रह काही पदाधिकाऱ्यांचा आहे. त्यामुळे ही गडबड सुरू असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: uncompleted building dy. president municipal