जलयुक्तशिवार योजनेअंतर्गंत पोंदेवाडीत वनतळी उन्हाळ्यातही भरपुर पाणी 

सुदाम बिडकर
सोमवार, 9 एप्रिल 2018

माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या सुचनेवरुन पोंदेवाडी गावाचा राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्याअंतर्गंत महसुल विभाग, कृषीविभाग व वनविभागाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात येणार आहे.

पारगाव (पुणे) - आंबेगाव तालुक्याच्या पुर्वभागातील पोंदेवाडी गावात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गंत वनविभागाच्या वतीने तयार करण्यात आलेली वनतळी भर उन्हाळ्यातही पाण्याने तुडुंब भरली असुन या पाण्याचे पुजन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या सुचनेवरुन पोंदेवाडी गावाचा राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्याअंतर्गंत महसुल विभाग, कृषीविभाग व वनविभागाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात येणार आहे. वनविभागाच्या वतीने पोखरकरवस्तीवर एक व गावालगत दोन अशाप्रकारे तीन शेततळी करण्यात आली आहेत. जवळून जाणाऱ्या डिंभा उजव्या कालव्यातील पाण्याने ही तीनही तळी तुडुंब भरली आहेत. या तळ्यातील पाण्याचे पुजन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष अनिल वाळुंज, भगवान वाघ, माजी सभापती जयश्री डोके, सरपंच पोपट रोडे, महेंद्र पोखरकर, संदिप पोखरकर, निलेश पडवळ, रामदास जाधव उपस्थित होते.

या तळ्यातील पाण्यामुळे कडक उन्हाळ्यात वन्यप्राण्याची पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे तसेच तळ्यातील पाण्यामुळे परिसरातील विहीरींच्या पाणी साठ्यात वाढ होणार आहे. त्याचा फायदा उन्हाळी पिकांना होणार आहे. उन्हाळ्याच्या टंचाईच्या काळात परिसरातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याचीही सोय होणार असल्याची माहीती वनरक्षक एस. एन. अनासुने यांनी दिली. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गंत तयार करण्यात आलेली वनतळी भर उन्हाळ्यातही पाण्याने तुडुंब भरली असुन या पाण्याचे पुजन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Under the Jalwantashwar Yojana in Pondewadi abundant water will be available in summer