#InternationalYogaDay2018 जागतिक योग दिनाच्या निमित्ताने 'पाण्याखाली योगासने'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

जागतिक योग दिवसाच्या निमित्ताने पुण्यात पाण्याखाली योगासने करुन आशियाई विक्रम केला जात आहे. खुशी परमार ही तरुणी पुण्याच्या टिळक तलावावर हा उपक्रम करत आहे.

पुणे- जागतिक योग दिवसाच्या निमित्ताने पुण्यात पाण्याखाली योगासने करुन आशियाई विक्रम केला जात आहे. खुशी परमार ही तरुणी पुण्याच्या टिळक तलावावर हा उपक्रम करत आहे.

आज(गुरुवार) जगभरात अनेक ठिकाणी जागतिक योग दिन साजरा केला जात आहे. पुण्यातही योग दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. डेक्कन परिसरातील टिळक जलतरण तलाव येथे खुशी पारमार ही तरुणी चार तास पाण्याखाली योगासने करुन आशियाई विक्रम करणार आहे.

'लेक वाचवा, लेक शिकवा' असा असा सामाजिक संदेशही त्यावेळी देत आहे. मुली निर्भय असतात हा संदेश देखिल खुशी देणार आहे. बॅराकुडा डायव्हिंग, फिनकिक अॅडव्हेंचर यांच्यावतीने हा उपक्रम घेण्यात येत आहे. स्कूबा डायव्हिंगचे अनेक रेकॉर्ड खुशीच्या नावावर आहेत. 

'योग' आयुष्याला समृद्ध करतो! - पंतप्रधान नरेंद्र मोदी

Web Title: under water yoga in pune International yoga day