भुयारी मेट्रोसाठी शंभर कोटींचे मशिन! (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

पुणे - जमिनीखालून २० ते २८ मीटर खालून मेट्रोचा ट्यूबच्या धर्तीवर दुहेरी भुयारी मार्ग साकारणार आहे. त्यासाठीच्या मशिनची किंमतच सुमारे १०० कोटी रुपये असेल ! भुयारी मार्गाचे काम येत्या दोन वर्षांत पूर्ण होणार आहे. 
शहरातील वनाज ते रामवाडी हा १५ किलोमीटरचा मार्ग एलिव्हटेड म्हणजे रस्त्यावर खांब उभारून त्यावरून मेट्रो धावेल, आशा स्वरूपाचा आहे.

पिंपरी चिंचवड ते स्वारगेट हा मेट्रोचा सुमारे १६ किलोमीटरचा मार्ग आहे. त्यातील पिंपरी ते शिवाजीनगरदरम्यानचा मार्ग एलिव्हटेड आहे. तर शिवाजीनगर ते स्वारगेटदरम्यानचा सुमारे ६ किलोमीटरचा मार्ग भुयारी आहे. त्यात शिवाजीनगर, फडके हौद, बुधवार पेठ (मंडई) आणि स्वारगेट ही स्थानके आहेत. मुठा नदीखालून सुमारे १२ ते १५ मीटरवर मेट्रोचा भुयारी मार्ग साकारणार आहे. फडके हौद ते स्वारगेटदरम्यान २० ते २८ मीटर खोल मेट्रोचा भुयारी मार्ग असेल. खोदाई करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येणार असल्यामुळे पृष्ठभागावरील बांधकामांना कोणताही धोका नसेल, असे महामेट्रोच्या भुयारी मार्गाचे प्रमुख प्रमोद आहुजा यांनी स्पष्ट केले आहे. फडके हौद स्थानकासाठी सुमारे ७ हजार चौरस मीटर जागा संपादित करण्याची महामेट्रोची प्रक्रिया सुरू आहे. भुयारी मार्गात ट्यूब असेल. त्यात मेट्रोचे दोन मार्ग असेल. मुबलक प्रकाश योजना, हवा खेळती राहण्यासाठी विशेष योजना त्यात असेल. 

आपत्कालीन प्रसंग उद्भवल्यास त्यासाठी देखील विशेष व्यवस्था असेल, असे आहुजा यांनी स्पष्ट केले आहे. भुयारी मार्गासाठी सध्या स्वारगेट आणि शिवाजीनगर येथे काम सुरू झाले आहे. भुयारी मार्गाचे काम येत्या दोन वर्षांत पूर्ण होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Web Title: Underground Metro Route