नागरिकांमध्ये आणि सैनिकामध्ये भावबंध निर्माण झाला पाहिजे- दिगेंद्र कुमार

ज्ञानेश्वर भंडारे
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

वाल्हेकरवाडी- सैनिक हे देशाचे रक्षण करतात. सैनिक आणि नागरिकांमध्ये भावबंध निर्माण झाला पाहिजे असे प्रतिपादन महावीर चक्र विजेते नायक दिगेंद्र कुमार यांनी चिंचवड येथे केले. ते पोलिस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशन व जैन विद्या प्रसारक मंडळ यांनी संयुक्त पणे आयोजित केलेल्या कारगिल दिनानिमित्त बोलत होते.  

यावेळी डॉ. शरद जोशी, राज्यमंत्री लेखा समिती सचिन पटवर्धन, ऍड राजेंद्र मुथ्या, अनिलकुमार कांकरिया, पोलीस फ्रेंड्स असोसिएशनचे अध्यक्ष गजानन चिंचवडे, गोपाळ बिरारी, हरीश मोरे आदी उपस्थित होते. 

पुढे बोलतांना नायक दिगेंद्र कुमार म्हणाले की, आजची तरुण पिढीमध्ये देशाविषयी देशभक्ती जागृत करण्याची गरज आहे, तरुणांनी जर ठरवले तर देशात आणखी बद्दल घडतील. यावेळी त्यांनी कारगिल युद्धाचा थरार मांडला. यावेळी विद्यार्थी आपल्या भावना व्यक्त केल्या. ऍड. सचिन पटवर्धन, गजानन चिंचवडे यांनीही आपले मत यावेळी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी सरोटे यांनी तर आभार मनीषा जैन यांनी मानले.

Web Title: understanding should be created between the citizens and the soldiers - Digendra Kumar