# बेरोजगारी शेती, स्वयंरोजगार, कला शाखांकडे जावे - प्रा. स्वाती कराड-चाटे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जुलै 2018

अभियांत्रिकी वा व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केला, तर चांगल्या पगाराची नोकरी मिळते, असा समज रूढ झाल्याने या विद्याशाखांकडे गर्दी वाढू लागली. पण, नोकऱ्या मात्र मर्यादित राहिल्या.
शैक्षणिक कुवत नसलेल्या विद्यार्थ्यांनादेखील प्रवेश मिळू लागला आणि विज्ञान, वाणिज्य शाखांकडील ओघ घटू लागला. आधीच दुसऱ्या शाखेचा निर्णय घेतला असता, तर चांगले करिअर करता आले असते.
आता व्यावसायिक पदवी घेऊन विद्यार्थी उभे आहेत, त्यांचे काय करायचे, असा प्रश्‍न आहे. त्यांच्यासाठी पदवीनंतर काही कौशल्याचे प्रशिक्षण आयोजित करावे लागेल.

नोकरी नाही, या मानसिकतेतून त्यांना बाहेर काढण्यासाठी त्यांच्यातील मूलभूत कौशल्य काय हे ओळखण्यासाठी मार्गदर्शन करावे लागेल. त्यांना शेती, स्वयंरोजगार, कला आदी शाखांकडे वळविता येईल. 
(प्रा. कराड या एमआयटी शिक्षण समूहाच्या कार्यकारी संचालक आहेत.)

आवड ओळखूनच शाखा निवडावी - डॉ. चंद्रकांत रावळ
शिक्षण रोजगाराभिमुख करायचे असेल, तर अध्यापन- अध्ययन पद्धती बदलावी लागेल. त्यासाठी सर्वांत आधी शिक्षकांचे प्रशिक्षण ही सर्वांत महत्त्वाची बाब आहे. 
शिक्षणातील मूल्यमापनाची पद्धती विद्यार्थ्याने काय लिहिले हे तपासते; परंतु विद्यार्थ्याने काय ज्ञान मिळविले, हे त्यातून तपासले गेले पाहिजे.
विद्यार्थ्याचा कल कोणत्या शाखेकडे आहे, हे तपासून अजूनही त्या पद्धतीने प्रवेश होत नाहीत. बेरोजगार तयार होण्याची सुरवात याचमुळे होते. शाळा, महाविद्यालयांमध्ये अशी व्यवस्था निर्माण झाली पाहिजे.
विद्यार्थ्यांमध्ये उपजत कौशल्य काय आहे, त्याला कोणते शिक्षण देण्याची गरज आहे, हेही ओळखता आले पाहिजे. शिक्षण ही गुंतवणूक म्हणून मानले, तरच त्यातून मिळणारा परतावा किती गुणवत्तापूर्ण आहे, याचा विचार करता येईल.
डॉ. रावळ हे बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत.)
 
रोजगार मेळाव्यासंबंधी सकाळमध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त -

#बेरोजगारी संवाद कौशल्य आवश्‍यक - ॲड. एस. के जैन 
#बेरोजगारी इंटर्नशिप सक्‍तीची हवी - डॉ. गजानन एकबोटे 
#बेरोजगारी विद्यार्थ्यांमध्ये कौशल्याचा अभाव - भरत फाटक 
#बेरोजगारी शिक्षण पद्धतीत बदल हवा: प्रतापराव पवार
कुणी नोकरी देता का नोकरी?

Web Title: Unemployment Go to self-employed and Art sites says Swati Karad-lats