शेततळ्यात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू    

हरिभाऊ दिघे 
शनिवार, 19 मे 2018

तळेगाव दिघे(जि. नगर) - संगमनेर तालुक्यातील वडगावलांडगा शिवारात शेततळ्यातील पाण्यात बुडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. भाऊसाहेब हरी मोरे ( वय ५० ) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. 

वडगावलांडगा येथील भाऊसाहेब मोरे हे आपल्या शेतानजीक असलेल्या यशवंत शंकर मोरे यांच्या शेतात सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास शेततळ्यावर मोटार चालू करण्यासाठी गेले होते. मोटर चालू करत असताना पाय घसरून ते शेततळ्यातील पाण्यात पडले. शेततळ्यात प्लॅस्टिकचा कागद टाकलेला होता. त्यामुळे त्यांना पाण्यातून बाहेर येता आले नाही. पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. 

उपसरपंच बाळासाहेब लांडगे यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर मृतदेह शेततळ्यातून बाहेर काढत घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी हलविण्यात आला. ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

Web Title: The unfortunate death of the farmer due to drowning in the water