पुण्यात अनोळखी तरूणाचा खून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

पिंपरी (पुणे) : डोक्यात दगड घालून एका अनोळखी व्यक्तीचा खून करण्यात आला. ही घटना तळवडे येथे सोमवारी (ता. १५) सकाळी उघडकीस आली.

पिंपरी (पुणे) : डोक्यात दगड घालून एका अनोळखी व्यक्तीचा खून करण्यात आला. ही घटना तळवडे येथे सोमवारी (ता. १५) सकाळी उघडकीस आली. पोलिस निरीक्षक प्रकाश धस यांनी दिलेल्या माहितीनुसार, तळवडे येथील स्मशानभूमीजवळ एक व्यक्ती जखमी अवस्थेत पडली असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाकडून देहूरोड पोलिसांना मिळाली. त्यानुसार घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना एका अनोळखी व्यक्तीचा डोक्यात दगड घालून खून केल्याचे दिसून आले.

मयत व्यक्तीच्या हातावर 'रंजना' असे मराठीमध्ये नाव गोंदलेले आहे. तसेच त्याने सफेद रंगाचा शर्ट आणि राखाडी रंगाची पँट असा वेश परिधान केलेला आहे. मयत व्यक्तीचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्ष आहे. या तरुणाबाबत कोणाला माहिती असल्यास त्यांनी देहूरोड पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक धस यांनी केले आहे.

Web Title: Unidentified youth's murder in in pune