
पुणे महापालिकेत कंत्राटी काम करणाऱ्या सुमारे आठ हजार कामगारांना दिलासा देणारा निर्णय प्रशासनाने ले घेतला असून, राज्य शासनाच्या २०१५ च्या आदेशानुसार नव्या नियमांनी एकसमान वेतन दिले जाणार आहे.
पुणे - पुणे महापालिकेत कंत्राटी काम करणाऱ्या सुमारे आठ हजार कामगारांना दिलासा देणारा निर्णय प्रशासनाने ले घेतला असून, राज्य शासनाच्या २०१५ च्या आदेशानुसार नव्या नियमांनी एकसमान वेतन दिले जाणार आहे. यामध्ये कुशल कामगारांना १९ हजार तर अकुशल कामगारांना १६ हजार रुपये वेतन देण्यात येणार आहे. याबाबत महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी आदेश काढले आहेत.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेत पदभरती झालेली नाही, त्यामुळे अनेक पद रिक्त आहेत. प्रशासनाचा कारभार चालविण्यासाठी महापालिकेच्या अनेक विभागात विकास प्रकल्प तसेच देखभाल दुरूस्तीच्या कामासाठी ठेकेदारांच्या माध्यमातून कंत्राटी कामगारांची नियुक्ती केली जाते. या कामगारांना वेतन देण्यासाठी नियमावली आहे, पण ठेकेदाराकडून त्याचे पालन होतेच असे नाही. अनेक कंत्राटी कामगारांचा भविष्य निर्वाह निधीही भरला जात नसल्याचे यापूर्वी समोर आले होते.
पुणे जिल्ह्यात लॉकडाउन? सोशल मीडियातील व्हायरल व्हिडिओवर जिल्हाधिकाऱ्यांच स्पष्टीकरण
कंत्राटी कामगारांचे शोषण थांबविण्यासाटी राज्यशासनाने २०१५ मध्ये सुधारीत वेतनदर लागू करण्याची अधिसूचना काढण्यात आली होती. पण त्यामध्ये शासनाने पुणे महापालिकेचा समावेश शेड्यूल इंड्स्ट्रीमध्ये केला होता. त्यामुळे पालिकेकडून सफाई आयोग, शॉप ऍक्ट, अभियांत्रिकी सेवा अशा वेगवेगळया निकषांनुसार कामाच्या स्वरूपानुसार, प्रत्येक कर्मचाऱ्यास वेगवेगळे वेतन दिले जात आहे. त्यामुळे काहींचे वेतन जास्त तर काहींचे कमी आहे. त्यासाठी २०१५ च्या आदेशाची अंमलबजावणी केली जावी अशी मागणी कामगारांकडून केली जात होती.
सदाशिव पेठेतील खानावळ सील; कोरोनाचे नियम न पाळल्याने पुणे महापालिकेचा दणका
यावर स्थायी समितीने मे २०२० मध्ये या प्रस्तावास मान्यता दिली होती. त्यानंतर आयुक्तांनी नऊ महिन्यांनी काढलेल्या आदेशाप्रमाणे प्रत्येक कर्मचाऱ्यास एकसमान वेतन मिळणार आहे. त्यांना ईएसआय व ईपीएफही मिळणार आहे. यात प्रत्येक सहा महिन्यांनी बदल होणार आहे.
भाजप पदाधिकाऱ्यासह ८ जणांना अटक; गुंड गजा मारणेच्या मिरवणुकीसाठी पुरवली होती आलिशान गाडी
असे असेल सुधारीत वेतन
वेतन घटक - कुशल - अर्ध कुशल - अकुशल
मुळ वेतन - १४ ००० - १३००० - ११५००
विशेष भत्ता - ५२५० - ५२५० - ५२५०
Edited By - Prashant Patil