चांदणी चौकाची चमक वाढणार; नितीन गडकरींनी टाकली कामावर नजर

Union Minister Nitin Gadkari visit Chandni Chowk pune
Union Minister Nitin Gadkari visit Chandni Chowk pune

पुणे : मागील काही दिवसांपासून चांदणी चौकातील प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया पालिकेने केल्यामुळे दोन मजली उड्डाणपुलाचे बांधकामाला वेग आला आहे. त्याची पाहणी आज शनिवारी सकाळी बारा वाजता केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केली.

चांदणी चौक, कोथरूड, वारजे, बाणेरसह परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी चांदणी चौकात दोन मजली उड्डाणपुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे. चांदणी चौकातून मुंबई, सातारा, मुळशी आणि कोथरूडकडे जाता येईल, अशी या पुलांची रचना करण्यात आली आहे.

हे वाचा - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी भाजपने घेतलं थेट शिवसेनेच्या मंत्र्याचं नाव

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते २७ ऑगस्ट २०१७ रोजी या पुलाचे भूमिपूजन करण्यात आले. या पुलासाठी १३.९२ हेक्टर जमिनीच्या भूसंपादनासह काही बंगले ताब्यात घेणार येणार होते. परंतु या उड्डाणपुलाचे काम भूसंपादनाअभावी तीन वर्षांपासून रखडले आहे. तत्कालीन महापालिका आयुक्त आणि विद्यमान विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला होता. त्यावेळी राज्य सरकारने महापालिकेला आर्थिक मदत जाहीर केली होती. यानंतर महापालिकेने समिती नियुक्त करून भूसंपादनाचे काम सुरू केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com