केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार सोमवारी महापालिकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार सोमवारी महापालिकेत

Pune : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार सोमवारी महापालिकेत

पुणे : कोरोनाच्या काळात महापालिकेने केलेले काम व तिसऱ्या लाटेसाठी असलेली तयारी याचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार उद्या (ता. १८) महापालिकेत येणार आहेत.

हेही वाचा: "हा काश्मीरींना बदनाम करण्याचा डाव"; फारूक अब्दूल्लांनी व्यक्त केली नाराजी

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत महापालिकेने आरोग्य सुविधांसाठी मोठे काम केले. दोन जम्बो रुग्णालय उभारण्यासह महापालिकेच्या रुग्णालयांचे सक्षमीकरण केले. आॅक्सिजन प्लांट उभारले, खासगी रुग्णालयात बेड न मिळाल्याने, आॅक्सिजन संपल्याने आणीबाणीच्या स्थितीत महापालिकेच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले. विशेषतः दुसऱ्या लाटेत शहरात रोज हजारो रुग्ण सापडत असताना अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. महापालिकेने आता तिसऱ्या लाटेसाठी सुद्धा तयारी करून ठेवली आहे. याचाच आढावा घेण्यासाठी डॉ. भारती पवार सोमवारी १२ महापालिकेत बैठक घेणार आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

दोन महिन्यात दुसरे केंद्रीय मंत्री

एकीकडे कोरोनाची तयारी तर दुसरीकडे अवघ्या काही महिन्यांवर महापालिकेची निवडणूक येऊन ठेपली आहे. पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी अभ्यासवर्ग ही सुरू आहेत. असे असताना दोन महिन्यांपूर्वी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले महापालिकेला भेट दिली होती. त्यानंतर नुकत्याच मंत्री झालेल्या डॉ. भारती पवार पुणे महापालिकेत येऊन कामाचा आढावा घेणार आहेत.

Web Title: Union Minister Of State For Health Dr Bharti Pawar In Municipal Corporation On

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top