शेतकरी आंदोलनावर रामदास आठवले बोलले

ramdas athavale reaction farmers protest
ramdas athavale reaction farmers protest

भोसरी - केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी शेतकऱी कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. शेतकऱ्यांसाठी केलेला कायदा मागे घेण्यासाठी शेतकऱ्यांनी गैरसमजातून केलेल्या आंदोलनाचा अतिरेक आहे असं ते म्हणाले. 

डॉक्टर बाबासाहेबांनी कायद्यात बदल करण्याचा अधिकार लोकसभा आणि राज्यसभेला दिला आहे. सध्या 'कायदा मागे घ्या, कायदा मागे घ्या' अशी सरकारकडे शेतकऱ्यांद्वारे सारखी मागणी होत आहे. कायदा मागे घेतल्यास सर्वच कायदे बदलण्याची मागणी सुरु होईल अशी शक्यता आठवले यांनी व्यक्त केली.

आज एक कायदा मागे घेतला तर आणखीही कायदे मागे घ्या यासाठी आंदोलन होईल. त्यामुळे झालेले प्रत्येक नवीन कायदेही बदलावे लागतीत. आम्हीही नामांतरासाठी आंदोलन केले. मात्र ते टप्प्या-टप्प्याने केल्याचे मत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आठवले यांनी भोसरीत व्यक्त केले. भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात घेण्यात आलेल्या 'मी रिपब्लिकन' मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी आमदार महेश लांडगे, चंद्रकांता सोनकांबळे, सुधाकर वारभुवन, परशुराम वाडेकर, सुर्यकांत वाघमारे, कमल कांबळे, विमल कांबळे, नितीन धोत्रे आदी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री आठवले पुढे म्हणाले, 'तरुण-तरुणींनी लघुउद्योगात उतरले पाहिजे. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाद्वारे लघुउद्योगांसाठी अनुदानही दिले जाते. त्याचा फायदा तरुण-तरुणींनी घेतला पाहिजे.  मात्र शासनाच्या महात्मा फुले आणि अण्णा भाऊ साठे स्वयंरोजगार विभागाकडून घेतलेले कर्ज काहीजण फेडत नाहीत. तर काहीजण कर्ज घेऊन लघुउद्योग न करता इतरत्र  पैसे वापरतात. त्यामुळे अडचणीत भर पडते. तरुणांनी मोठमोठे कटआऊट (होर्डिंग्ज) उभे न करता स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे. भूमिहिनांना जमिनी देण्यासाठी राज्यशासनाने पाऊले उचलली पाहिजेत असंही ते म्हणाले.

आमदार लांडगे म्हणाले, "दिल्लीमध्ये रामदास आठवले यांच्या कार्यालयात इतर कार्यालयापेक्षा अधिक गर्दी असते. आठवलेजींकडे थेट तक्रारी मांडता येत असल्याचे नागरिक सांगून त्यांचे कौतुक करतात." या वेळी गायिका कडूबाई खरात यांच्या भीमगीते गायनाचा कार्यक्रम झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com