...म्हणून पुण्यात आलेले केंद्रीय जलशक्ती मंत्री झाले नाराज

राजेंद्रकृष्ण कापसे
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

ज्या झाडावर चिमणी देखील बसत नाही, रस्त्याच्या कडेला शोभेसाठी लावले जाणारे झाड मला आज लावावे लागले. ज्या झाडावर चिमणी देखील बसत नाही, असे म्हणत केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी नाराजी व्यक्त केली.

खडकवासला : ज्या झाडावर चिमणी देखील बसत नाही, रस्त्याच्या कडेला शोभेसाठी लावले जाणारे झाड मला आज लावावे लागले. ज्या झाडावर चिमणी देखील बसत नाही, असे म्हणत केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी नाराजी व्यक्त केली.

केंद्रीय जल आयोगाच्या एका कार्यक्रमानिमित्त शेखावत खडकवासला येथे आले होते. ते येथे आले त्याच्या निमित्त आयोगाच्या येथील प्रशासनाने मंत्र्यांच्या हस्ते पुकर जातीचे झाड यावेळी लावले. पुकर जातीच्या झाडाचा आम्ही प्रचार करायचा का, त्या ऐवजी आंब्याचे झाड का आणले नाही असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Union Minister for Water Resources angry in Pune