पिंपरी-चिंचवड सायन्स पार्कचा अनोखा उपक्रम; काय आहे वाचा सविस्तर 

pcmc.jpg
pcmc.jpg

पिंपरी ः शालेय जीवनात प्रत्येकजण पुस्तकांमधून विज्ञानाची ओळख करुन घेत असतात. परंतु, प्रत्यक्ष वैज्ञानिक प्रयोग कसे असतात, त्या मागील विज्ञान काय आहे, हे पिंपरी-चिंचवड सायन्स पार्कमार्फत दाखवून दिले जात आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

लॉकडाऊनच्या काळात देखील विद्यार्थ्यांच्या मनातील विज्ञानाच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट होण्यात मदत होत आहे. 
विद्यार्थ्यांची वैज्ञानिक जिज्ञासा वाढावी यासाठी पिंपरी-चिंचवड सायन्स पार्कमार्फत, लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून घर बसल्या "प्रयोगातील विज्ञान ओळखा' हा अनोखा उपक्रम राबविला जात आहे. त्याअंतर्गत, आतापर्यंत सुमारे 15 विज्ञानावर आधारित प्रयोग संस्थेच्या फेसबुक, इन्स्टाग्रामवरुन विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले आहेत. त्याची उत्तरे विद्यार्थ्यांकडून मागविण्यात येत आहेत. 

सायन्स पार्कचे शैक्षणिक सहाय्यक सुनील पोटे म्हणाले "विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या मूलभूत संकल्पना कळाव्यात हा "प्रयोगातील विज्ञान ओळखा' या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. त्यादृष्टीने, आम्ही संस्थेच्या फेसबुक, इन्स्टाग्रामवरुन विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या प्रयोगावर आधारित सुमारे दीड मिनिटांची व्हिडिओ क्‍लिप दाखवित आहोत.

दरम्यान, विद्यार्थ्यांनी घरी राहूनच त्यातील विज्ञान आम्हाला संस्थेच्या ई-मेल आयडीवर कळवायचे आहे. या उपक्रमाला आतापर्यंत सुमारे 500 ते 1 हजार विद्यार्थी जोडले गेले आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्याला प्रतिसाद दिला आहे. काही विद्यार्थ्यांनी घरी राहून स्वतःकाही व्हिडिओ बनवून आम्हाला पाठविले आहेत. लॉकडाऊन संपेपर्यंत हा उपक्रम आम्ही राबविणार आहोत.'' 

संस्थेचे संस्थापक-संचालक प्रवीण तुपे, शिक्षणाधिकारी नंदकुमार कासार यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत प्रकाशाचे अपवर्तन, बर्नोलीचा हवेच्या दाब, उष्णतेमुळे पदार्थाचे प्रसरण, न्यूटनची जडत्वाची संकल्पना(फर्स्ट लॉ ऑफ मोशन), दृष्टीभ्रम (इल्युजन) आदी 10 ते 15 प्रकारचे प्रयोग विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले आहेत. त्यामध्ये मुख्यत्वे इयत्ता चौथी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. अचूक उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे, लॉकडाऊन संपल्यावर पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. संस्थेच्या शैक्षणिक स्वयंसेवक काजल क्षीरसागर यांचे या उपक्रमासाठी सहकार्य लाभत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com