सुकलवाडीत तनिष्कांनी केले अनोखे 'लक्ष्मीपुजन'

valhe.jpg
valhe.jpg

वाल्हे : दिवाळीचा सण म्हटले कि,''रंगरंगोटी आकाश कंदील, फराळांचे पदार्थ, रांगोळी यांच्यासोबत येणारे लक्ष्मीपुजन, भाऊबीज, दिवाळी पाडवा.''प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने हे दिवस साजरे करत असतात. मात्र, सुकलवाडी(ता.पुरंदर) येथील 'सकाळ' 'तनिष्का' ग्रुपच्यावतीने पारंपारिक लक्ष्मीपुजनाला फाटा देत गावातील जवळपास
35 मुलींची पुजा करुन त्यांना भेटवस्तु देत अनोखे लक्ष्मीपुजन साजरे केले.

दिवाळीमधील 'लक्ष्मीपुजन' हा दिवस सर्वात महत्वाचा दिवस मानला जातो. घरासमोर केलेली पणत्यांची आरास, पारंपारिक पद्धतीने देवघरामध्ये लक्ष्मी देवीची प्रतिमा, दिवाळीचा फराळ यांच्यासोबत लक्ष्मी म्हणुन केरसुणीची केली जाणारी पुजा, हे चित्र सर्वत्र पहावयास मिळते. मात्र या पारंपारिक लक्ष्मी पुजनाला फाटा देत सुकलवाडी येथील 'सकाळ' 'तनिष्का' ग्रुपच्या वतीने यंदाचे लक्ष्मीपुजन वेगळे करण्याचा निर्णय घेतला. एवढ्यावरच न थांबता आज त्यांनी तो आमलात देखील आणला. आपल्या 
गावातील तब्बल 35 मुलींचे पारंपारिक पद्धतीने औक्षण करुन त्यांना पुणे जिल्हा बॅकेचे माजी अध्यक्ष प्रा.दिगंबर दुर्गाडे यांच्या हस्ते पुस्तकरूपी भेटवस्तु देऊन त्यांचे 
यथोचीत स्वागत केल्याने त्यांचा हा अनोखा लक्ष्मीपुजन सोहळा परिसरामध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

याबाबत बोलताना प्रा. दिगंबर दुर्गाडे म्हणाले कि, ''आज समाजात मुलींच्या विषयी वेगवेगळया घटना घडत असतात. वाचन संस्कृती देखील बंद झाली आहे. या दोन्ही
विषयांना पुर्वीचे वैभव प्राप्त व्हावे मुली आणि महिलांबद्दलच्या समाजाच्या असलेल्या भावनांमध्ये बदल व्हावा त्यासाठी येथील 'तनिष्कां'नी लक्ष्मीपुजनादिवशी केरसुणी पुजण्यापेक्षा लक्ष्मीचे पुजन केले.'' त्याचबरोबर पुस्तके वाटुन वाचन संस्कृतीला चालना देण्याचा केलेला प्रयत्न हे दोन्ही देखील आदर्शवत असल्याचे प्रतिपादन केले.

या वर्षी आम्ही खऱ्याखुऱ्या मुलींच्या रूपातील गावातील जवळपास 35 लक्ष्मींचे  मंदिरामध्ये त्यांचे पारंपारिक पद्धतीने औक्षवन करुन पुजन केले आहे. त्यांच्या पुजनाने गावामध्ये भरभराट होईल यात शंकाच नसल्याचे मत 'तनिष्का',ग्रुपच्या अध्यक्षा रूपाली पवार व सुप्रिया पवार त्यांनी व्यक्त केले. यावेळी सरपंच जयश्री चव्हाण, दत्तात्रय पवार, प्रल्हाद पवार, संतोष नवले, नारायण पवार, सुर्यकांत भुजबळ, सोनाली यादव, सुवर्णा चव्हाण आदि उपस्थित होते. तनिष्का ग्रुपच्या जयश्री पवार, शोभा पवार, निलम पवार, पुजा पवार,कविता पवार यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. 'तनिष्का' ग्रुपच्या तृप्ती पवार यांनी प्रास्ताविक केले. अश्विनी चव्हाण यांनी सुत्रसंचालन तर सोनाली पवार यांनी आभार मानले.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com