मॅक्रोग्राफर्सच्या दुनियेचे अनोखे विश्‍व 

सुवर्णा चव्हाण
बुधवार, 27 जून 2018

पुणे : रंगबिरंगी फुलपाखरू असो वा फुलांवर बसलेली मधमाशी... छोटासा बेडूक असो वा मुंगी... त्यांच्या विश्‍वातील विविध पैलू व त्यातील सौंदर्य उलगडणाऱ्या "सूक्ष्म' (मॅक्रो) फोटोग्राफीची वेगळी संकल्पना पुण्यात रुजविण्याचे काम "पुणे मॅक्रोग्राफर्स ग्रुप' करत आहे. ज्या वस्तू किंवा जे कीटक डोळ्यांनी नीट पाहता येऊ शकत नाहीत, अशा छोट्या वस्तू आणि कीटकांचे विश्‍व टिपण्याचा या ग्रुपमधील छायाचित्रकार अनोखा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या छायाचित्रांना जागतिक स्तरामधील प्रदर्शनांमध्येही स्थान मिळत आहे. 

 plant and nature

वन्यजीव छायाचित्रणापलीकडे खास सूक्ष्म छायाचित्रणासाठी 2014 मध्ये अन्वय नाकाडे आणि योगेंद्र जोशी या हौशी छायाचित्रकारांनी या ग्रुपची सुरवात केली. सध्या ग्रुपचे 30 छायाचित्रकार सूक्ष्म फोटोग्राफी करत आहेत. या ग्रुपला फेसबुकच्या माध्यमातून 400 छायाचित्रकार जोडले गेले असून, त्यांच्यात या छायाचित्रणाची आवड निर्माण करण्याचे काम विविध उपक्रमांद्वारे ग्रुपचे सदस्य करत आहेत. या छायाचित्रणाद्वारे छोट्या वस्तूमधील डिटेल्स आपल्याला कळतात. दुर्मीळ कीटकांसह इतर सूक्ष्म प्राण्यांचे जग यातून टिपता येते. त्यासाठी खूप प्रयत्नही करावे लागतात. छायाचित्रणाची ही नवी संकल्पना देशात आता कुठे रुजत आहे, असे पुष्कर अच्युते याने सांगितले. 

Image may contain: plant, flower and nature

काय आहे सूक्ष्म फोटोग्राफी 
आपल्या सभोवताली असणाऱ्या सूक्ष्म वस्तू किंवा कीटकांचे सौंदर्य आणि त्याच्या विश्‍वातील विविध पैलू कॅमेऱ्याद्वारे टिपण्यात येतात. त्यासाठी विशिष्ट प्रकारचे कॅमेरे, लेन्सेस आणि साहित्य लागते. साधारणतः 90 एमएम ते 100 एमएम मॅक्रो लेन्सेसद्वारे या प्रकारचे छायाचित्रण केले जाते. त्यामुळे त्या सूक्ष्म वस्तूमधील संपूर्ण तपशील कॅमेऱ्यात कैद होतो. 
Image may contain: flower, plant, nature and outdoor
विविध उपक्रम 
ग्रुपतर्फे दर महिन्याला मॅक्रो फोटोवॉक आणि मॅक्रो फोटोग्राफी कार्यशाळा घेण्यात येतात. पुण्यातील वेगवेगळ्या टेकड्या, तलाव आणि जंगल परिसरात अशा प्रकारचे फोटोवॉक ते आयोजित करतात. 

''अशी फोटोग्राफी भारतात कमी होते, त्यासाठी विशिष्ट प्रकारच्या लेन्सेस आणि साहित्य लागते. आता नवोदित छायाचित्रकारांचा अशा प्रकारच्या छायाचित्रणाकडे कल वाढला आहे. छोटेसे फूल असो वा कीटक... कोणत्याही छोट्या वस्तूमध्ये दडलेले सौंदर्य या छायाचित्रणातून लोकांसमोर येत असून, असे छायाचित्र टिपण्याचा आनंद काही औरच असतो. आम्ही टिपलेल्या या छायाचित्रांचा अभ्यास आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभागाकडून होत आहे.''
- पुष्कर अच्युते, सदस्य, पुणे मॅक्रोग्राफर्स ग्रुप 

No automatic alt text available.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unique World in the World of Macros