दिल्लीत असलो तरी विद्यापीठाकडे लक्ष देणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 ऑक्टोबर 2018

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अनेकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे माझे व्यक्तिमत्त्व घडत गेले. यापुढे दिल्लीत असलो तरी लक्ष आपल्या विद्यापीठाकडे निश्‍चितपणे असेल, अशा शब्दांत विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आरोग्यशास्त्र विभागाचे प्रमुख असलेल्या डॉ. पटवर्धन यांची विद्यापीठ अनुदान आयोगाच्या उपाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती झाली आहे. यानिमित्त डॉ. पटवर्धन यांचा सत्कार कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, प्रभारी कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, भाग्यदा पटवर्धन आदी उपस्थित होते.

विद्यापीठ अनुदान आयोगांतर्गत देशातील ४० हजार महाविद्यालये येतात. त्यांची गुणवत्ता सुधारली तरच आयोगाचे चांगले काम झाले, असे म्हणता येईल. त्यामुळे देशाला काहीतरी चांगले देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल, असेही डॉ. पटवर्धन यांनी सांगितले. डॉ. करमळकर यांनी डॉ. पटवर्धन यांचा गौरव केला. डॉ. पवार यांनी प्रास्ताविक केले. आनंद देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: University dr bhushan patwardhan