विद्यापीठातील उद्यानात बहरणार दुर्मीळ वनौषधी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

पुणे - पांढरा धूप, नागकेशर, सर्पगंधा, काळाकुडा, सप्तरंगी अशा दुर्मीळ औषधी प्रजाती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील औषधी वनस्पती उद्यानात पाहायला मिळणार आहेत. विद्यापीठातील पाच एकर क्षेत्रात हे उद्यान विकसित केले असून, यात राज्यात आढळणाऱ्या सातशे औषधी वनस्पतींपैकी दोनशेहून अधिक प्रजातींची लागवड आतापर्यंत करण्यात आली आहे.

उद्यानात जवळपास एक हजाराहून अधिक झाडे आहेत. वेगाने नष्ट होत चाललेल्या वनसंपदेचे संवर्धन करणे, हा या उद्यानाचा उद्देश आहे.

केंद्रीय आयुष मंत्रालयाने यासाठी १३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यात अनेक दुर्मीळ प्रजातींचा समावेश आहे. ‘महामना वैद्य शंकर दाजीशास्त्री पदे औषधी वनस्पती उद्यान’ असे उद्यानाचे नामकरण केले जाणार आहे.

पुण्यातील वैद्य खडीवाले यांनी विद्यापीठामध्ये अशा स्वरूपाचे उद्यान तयार करण्यासाठी जवळपास दोन दशकांपूर्वी निधी दिला होता. त्यानंतर २०१३ मध्ये उद्यानासाठी जागा आरक्षित करण्यात आली होती. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे उद्यान विकसित करण्यात येत आहे.

आयुर्वेदासह इतर विविध उपचार पद्धतीत वापरल्या जाणाऱ्या; तसेच आदिवासी औषधी प्रकारात वापरल्या जाणाऱ्या प्रजातींचाही उद्यानात समावेश आहे. उद्यानाच्या माध्यमातून दुर्मीळ वनस्पतींसह वनौषधीसंदर्भात संशोधन करणे शक्‍य होणार आहे.
- डॉ. दिगंबर मोकाट, प्रकल्पाचे प्रमुख संशोधक

Web Title: university garden Rare herbal