पुणे विद्यापीठ पहिल्या शंभरात 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

पुणे - क्वायकॅरली सायमन्सने (क्‍यूएस) जाहीर केलेल्या "क्‍यूएस ब्रीक्‍स युनिव्हर्सिटी रॅंकिंगमध्ये पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पहिल्या शंभर विद्यापीठांमध्ये स्थान मिळविले आहे, तर सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाने 109व्या क्रमांकाचे स्थान पटकाविले आहे. क्‍यूएस इंडिया युनिर्व्हसिटी रॅंकिंगमध्ये पुणे विद्यापीठ 19व्या, तर सिंबायोसिस अभिमत विद्यापीठ 23व्या स्थानावर आहे. 

प्राध्यापक आणि विद्यार्थी प्रमाण, प्राध्यापकांचे संशोधन पेपर, पीएच.डी.धारक प्राध्यापक, परदेशी प्राध्यापक आणि परदेशी विद्यार्थी, या निकषांच्या आधारे विद्यापीठांचे मूल्यमापन करण्यात आले आहे. जागतिक स्तरावरील क्‍यूएस वर्ल्ड युनिर्व्हसिटी रॅकिंगमध्ये पुणे विद्यापीठ 801 ते 1000 या क्रमवारीत आहे. गेल्यावर्षी क्‍यूएस ब्रीक्‍स रॅंकिंगमध्ये पुणे विद्यापीठ 151 ते 160 या क्रमवारीत आणि सिंबायोसिस विद्यापीठ 144 व्या क्रमांकावर होते. क्‍यूएसतर्फे यंदा पहिल्यांदाच देशातील शैक्षणिक संस्थांचे "क्‍यूएस इंडिया युनिर्व्हसिटी रॅंकिंग'ही करण्यात आले आहे. यात सार्वजनिक विद्यापीठे, खासगी विद्यापीठे, उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था, अभिमत विद्यापीठे अशा शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने "ब्रीक्‍स युनिर्व्हसिटी रॅंकिंग'मध्ये पहिल्या शंभर विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळविला आहे, तर देशांतर्गत शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यापीठ 19व्या स्थानावर आहे; परंतु क्‍यूएस रॅंकिंगमध्ये विद्यापीठाने स्वत:हून सहभाग नोंदविलेला नाही. 
डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 

Web Title: University of Pune in the ranking first century