#SPPU पुणे विद्यापीठाची अधिसभा येत्या शनिवारी 

मिनाक्षी गुरव
मंगळवार, 16 एप्रिल 2019

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पुढे ढकललेली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पूर्वनियोजित अधिसभा आता येत्या शनिवारी (ता.20) होणार आहे. विद्यापीठाच्या 2019-20 या वर्षातील अर्थसंकल्पावर ही अधिसभा होणार आहे. 

राज्यातील विद्यापीठांना लोकसभा निवडणूक झाल्यानंतरच अधिसभा घ्यावी लागेल, असे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने काही दिवसांपूर्वी काढलेल्या परिपत्रकात नमूद केले होते. त्यानुसार पुणे विद्यापीठासह राज्यातील अन्य विद्यापीठांच्या अधिसभाही पुढे ढकलण्यात आल्या. मात्र, उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या या परिपत्रकाविरोधात विद्यापीठ विकास मंचातर्फे उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली.

त्यानुसार "विद्यापीठ ही स्वायत्त संस्था असल्याने त्यांना निवडणुकीची आचारसंहिता लागू होत नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने मार्च महिन्यांच्या अखेरीस दिला. त्यानुसार पुणे विद्यापीठाने पुढे ढकललेली पूर्वनियोजित अधिसभा पुन्हा घेण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरवात केली आणि अखेर अधिसभेचा कालावधी विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात आला.

Web Title: The University of Pune's Senate will be held on Saturday